Prasad Oak : दिघे साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी..., प्रसाद ओकने सांगितली पडद्यामागची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 04:32 PM2022-08-21T16:32:50+5:302022-08-21T16:35:47+5:30
Dharmaveer : प्रसाद ओक ते दिघे साहेब हा प्रवास ऐका खुद्द प्रसाद ओककडून...
‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ ( Dharmaveer) हा सिनेमा रिलीज होऊन काही महिने उलटले. पण अद्यापही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak ) याने साकारलेली आनंद दिघेंची भूमिका अपार गाजली. आज रविवारी संध्याकाळी हा सिनेमा झी मराठीवर प्रदर्शित होतोय. यानिमित्त प्रसाद ओक यांनी ‘धर्मवीर’ या सिनेमाच्या अनेक आठवणी, अनेक किस्से, हा चित्रपट कसा घडला, हे सांगितलं.
झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंवर प्रसाद ओकचे काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओत प्रसाद ‘धर्मवीर’ आणि दिघे साहेबांबद्दल भरभरून बोलतोय.
दिघे साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी खरी आहे....
दीर्घ साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी खरी आहे.दिघे साहेबांबद्दल गुगलवर सर्च केलं की एक म्हणजे सिंघानिया रूग्णालय आणि त्यानंतरच्या एक दोन गोष्टी एवढंच समोर येतं. ते सर्व पुसलं जावं आणि त्यांचं महान कार्य, त्यांचं काम किती मोठं आहे हे लोकांसमोर यावं. अनेक लोकांशी बोलून जेव्हा दहा-दहा बारा लोकांकडून एक किस्सा पुन्हा पुन्हा सांगितला जायचा, तेव्हा तो किती खरा आहे याची खात्री पटायची आणि तेच दाखवलं आहे, असं प्रसाद ओकने सांगितलं.
तेव्हा ८ ते १० मिस्डकॉल्स होते...
या सिनेमाची सुरूवात कशी झाली, हेही त्याने सांगितलं. तो म्हणला,‘मी मोबाईल चेक करण्यासाठी उठलो तेव्हा 8 ते 10 मिस्डकॉल्स होते. त्यातले 4 मिसकॉल हे मंगेश देसाई यांचे होते. त्यानंतर मी ताबडतोब त्याला फोन केला. त्याने मला 14 तारखेचा दुपारी 2 ते 2.30 पर्यंतचा वेळ मोकळा ठेव असे मला सांगितलं. मी तिथे गेलो. मेकअप सुरू केला त्यांनी आणि सामान्यपणे मेकअप करताना डोळ्यांखाली असलेले डार्क सर्कल झाकले जातात. पण त्यादिवशी मेकअप दादांनी पहिली पॅलेट हातात घेतली ती काळ्या रंगाची. त्यांनी काळं असं खूप वाढवलं माझ्या डोळ्यांखालचं. त्यानंतर त्यांनी मला दाढी लावली. मिशी लावली. त्यानंतर विग काढला पिशवीतून. मला केसांचा विग देखील लावला. मी त्यावेळी त्यांना कशासाठी मेकअप करताय असे विचारलं. कारण तोपर्यंत मला काहीच माहित नव्हतं. त्यांनी मला कपडे घालायला सांगितले आणि बाहेर जा असे सांगितलं. मागून मंगेश आला. त्याने मला पाहिलं आणि बास्स, आपण पहिला टप्पा जिंकलोय पश्या, असं मला म्हणाला.
ज्या माणसाला लाखो करोडो माणसं देव मानतात, दैवत मानतात अशा माणसाची भूमिका करण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आलं. पण ते तितक्यात सक्षमपणे ताकदीने मला निभवता आलं पाहिजे असं टेन्शनही होतं. त्यावेळी मला आनंदही होता आणि प्रचंड दुखंही होते. त्यांचे फोटो व्हिडीओ पाहून मी त्यांना साकारायचा प्रयत्न मी केला.
तेव्हा त्यांच्यासमोर हात जोडायचो...
मी प्रत्येक वेळेला जेव्हा शॉट करायला जायचो तेव्हा दिघे साहेबांचा फोटो पाहायचो आणि तेव्हा त्यांच्यासमोर हात जोडायचो आणि एकच मागण मागायचो ते म्हणजे त्यांचा आशीर्वाद. मला तुमचा आशीर्वाद तुमच्या डोळ्यांच्या रुपाने द्या, असे मी त्यांना वारंवार सांगायचो. असे चित्रपट वारंवार निर्माण होत नाही. खूप वर्षांनी होतात. पण त्याचा इम्पॅक्ट वर्षांनुुवर्षे राहतो..., असं प्रसाद म्हणाला.
‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट 13 मे 2022 ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.