Dharmaveer Box Office Collection : तिसऱ्या आठवड्यानंतरही बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’ राज्य, कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 05:39 PM2022-06-06T17:39:50+5:302022-06-06T17:48:34+5:30

Dharmaveer प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने कोट्यवधीची कमाई केली आहे.

Prasad oak starrer anand dighe dharmaveer marathi movie ३rd week box office collection | Dharmaveer Box Office Collection : तिसऱ्या आठवड्यानंतरही बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’ राज्य, कमावले इतके कोटी

Dharmaveer Box Office Collection : तिसऱ्या आठवड्यानंतरही बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’ राज्य, कमावले इतके कोटी

googlenewsNext

Dharmaveer Box Office Collection : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ ( Dharmaveer- Mukkam Post Thane) या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.  13 मे रोजी हा चित्रपट रिलीज असून तेव्हापासून चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने कोट्यवधीची कमाई केली आहे.

तब्बल चारशेहुन अधिक चित्रपटगृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 2.5 कोटींची कमाई करत विक्रमी सुरुवात केली होती. यानंतर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 13.86 कोटींची कमाई केली होती. आता या सिनेमाने २२  कोटींचा टप्पा पार केला आहे.

तिसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा हाऊसफुल्ल गेला. या चित्रपटाने आतापर्यंत २२. ५८ कोटींची कमाई केली आहे.‘धर्मवीर’ चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत आहे. प्रसाद ओकने या चित्रपटामध्ये आनंद दिघेंची हुबेहुब अशी देहबोली साकारली आहे. त्यांची दाढी, त्यांचा एकूण लूकही प्रसाद ओकने व्यवस्थितरित्या अवलंबला आहे. इतकंच नव्हे तर त्यांची देहबोली, आवाजातील चढउतार देखील प्रसादने चांगल्याप्रकारे स्विकारल्याचं दिसून येतंय. या चित्रपटात एक दमदार पोवाडा असून तो शाहिर नंदेश उमप यांनी संगीतबद्ध केला असून त्यांनीच तो गायला आहे.
 

Web Title: Prasad oak starrer anand dighe dharmaveer marathi movie ३rd week box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.