'धर्मवीर' स्टाईलने प्रसाद ओकने महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 09:56 AM2022-07-01T09:56:00+5:302022-07-01T10:14:28+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक ( Prasad Oak)ने खास पोस्ट लिहिलेली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

Prasad Oak write a special post for Chief Minister of Maharashtra eknath shinde | 'धर्मवीर' स्टाईलने प्रसाद ओकने महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा, म्हणाला...

'धर्मवीर' स्टाईलने प्रसाद ओकने महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा, म्हणाला...

googlenewsNext

अत्यंत नाट्यमय घटनांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राजभवनवर शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाचे एकमात्र दावेदार मानले जात असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवे उपमुख्यमंत्री झाले.  सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक ( Prasad Oak)ने ही मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्यात. प्रसाद यानं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे (Dharamveer  Mukkam Post Thane)  या सिनेमात धर्मवीर आनंद दिघे ( Dharamveer  Anand Dighe) यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा होता. प्रसाद आणि एकनाथ शिंदे यांच्यात फार चांगले संबंध आहेत. 

प्रसाद ओकनं धर्मवीर सिनेमातील एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोत धर्मवीर सिनेमात आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओकने एकनाथ शिंदे यांच्या खाद्यांवर हात ठेवला आहे. हा फोटो धर्मवीरच्या ट्रेलर लाँच वेळीचा असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तर दुसरा फोटो  हा धर्मवीर सिनेमातील आहे. एकनाथ शिंदे देवाच्या पाया पडत असताना आनंद दिघे त्यांना पाहत आहेत.  

प्रसाद ओकने आपल्या फोटोमध्ये लिहिले,मा. मुख्यमंत्री...श्री एकनाथजी शिंदे साहेब...मनःपूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा...!!! प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतेय.

‘धर्मवीर’ चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिका साकारली आहे. प्रसाद ओकने या चित्रपटामध्ये आनंद दिघेंची हुबेहुब अशी देहबोली साकारली आहे. त्यांची दाढी, त्यांचा एकूण लूकही प्रसाद ओकने व्यवस्थितरित्या अवलंबला आहे. इतकंच नव्हे तर त्यांची देहबोली, आवाजातील चढउतार देखील प्रसादने चांगल्याप्रकारे स्विकारल्याचं दिसून आलं.

Web Title: Prasad Oak write a special post for Chief Minister of Maharashtra eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.