या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे...!!! धर्मवीरसाठी पुरस्कार मिळाल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 11:30 AM2022-07-08T11:30:43+5:302022-07-08T11:34:26+5:30

पुरस्कार स्विकारताना प्रसाद भावूक झालेला ही पाहायला मिळाला. याचा एक व्हिडीओ आणि काही फोटोज प्रसादने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेत.

Prasad Oak's post viral after receiving the award for Dharmaveer movie | या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे...!!! धर्मवीरसाठी पुरस्कार मिळाल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे...!!! धर्मवीरसाठी पुरस्कार मिळाल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

मुक्काम पोस्ट ठाणे (Dharamveer Mukkam Post Thane) या सिनेमात प्रसाद ओकने धर्मवीर आनंद दिघे ( Dharamveer Anand Dighe) यांची भूमिका साकारली होती. प्रसाद ओकने या चित्रपटामध्ये आनंद दिघेंची हुबेहुब अशी देहबोली साकारली आहे. त्यांची दाढी, त्यांचा एकूण लूकही प्रसाद ओकने व्यवस्थितरित्या अवलंबला आहे. इतकंच नव्हे तर आवाजातील चढउतार देखील प्रसादने चांगल्याप्रकारे स्विकारल्याचं दिसून आलं. इतर बऱ्याच बारीकसारीक गोष्टींवर प्रसादनं अत्यंत बारकाईनं काम केलं आहे. चित्रपटातील प्रसादचा अभिनय पाहून सगळेच भारावून गेले. आनंद दिघेंच्या व्यक्तिरेखेला प्रसाद ओकशिवाय अन्य कोणताही अभिनेता न्याय देऊ शकला नसता. खरे वाटावेत असे दिघे प्रसादने सादर केले आहेत. 
 

सिनेमा रिलीज झाल्यानंतर अभिनेता प्रसाद ओक एका थिएटरमध्ये पोहचला तेव्हा हा उत्सफुर्त प्रतिसाद प्रसादला पाहायला मिळाला. धर्मवीर सिनेमा रिलीज आधी, प्रमोशन दरम्यान तसेच रिलीजनंतर असे अनेक खास क्षण प्रसादने अनुभवले. आता मात्र धर्मवीर सिनेमामुळे प्रसादला आणखी एक खास क्षण अनुभवायला मिळालाय. रिलीजच्या अवघ्या दोन महिन्यानंतरच धर्मवीर सिनेमाने पहिला वहिला पुरस्कार पटकवलाय. याबाबतची नुकतीच एक पोस्ट प्रसादने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलीय.

धर्मवीर सिनेमाला नुकताच शाहिर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान २०२२ हा पुरस्कार जाहिर झाला आहे. पुरस्कार स्विकारताना प्रसाद भावूक झालेला ही पाहायला मिळाला. याचा एक व्हिडीओ आणि काही फोटोज प्रसादने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेत.  

"पहिला पुरस्कार धर्मवीर साठी" सांगताना अत्यंत आनंद होतोय कि आज #धर्मवीर साठी या वर्षीचा "दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान" मला मिळाला. हा सन्मान मी मा. आनंद दिघे साहेबांना समर्पित करतो. हि संधी मला दिल्याबद्दल दिग्दर्शक मित्र प्रवीण तरडे आणि निर्माते मित्र मंगेश देसाई यांचे मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर खा.मा. श्रीकांतजी शिंदे आणि मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेही मनःपूर्वक आभार. या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल "महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास", सौ माणिकताई व श्री पद्माकर मोरे आणि संतोष परब या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे...!!! पुरुषोत्तम बेर्डे सरांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला ह्याचाही आनंद आहेच...!!! लोकनेत्याच्या भूमिकेसाठी लोकशाहीराच्या नावाने सन्मानित व्हावं यासारखं भाग्य नाही...!!!  श्री नटराजा...शतशः प्रणाम...!!! असं कॅप्शन त्याने या फोटोसोबत दिलं आहे. प्रसादचे चाहते त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतायेत. 
 

Web Title: Prasad Oak's post viral after receiving the award for Dharmaveer movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.