प्रशांत दामले म्हणतायेत, कोरोनाची टेस्ट केली असता मी काठावर पास झालो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 05:25 PM2020-12-18T17:25:57+5:302020-12-18T17:27:21+5:30

प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली असून एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे आगामी काही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

prashant damle tested positive for covid 19, eka lagnachi pudhchi goshta shows got cancelled | प्रशांत दामले म्हणतायेत, कोरोनाची टेस्ट केली असता मी काठावर पास झालो

प्रशांत दामले म्हणतायेत, कोरोनाची टेस्ट केली असता मी काठावर पास झालो

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशांत दामले यांनी कोरोनाची टेस्ट केल्यानंतर त्यांना आता सात दिवस आयसोलेशनमध्ये राहाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनीच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. सध्या भारतात सुरू असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशभरातील नाट्यगृहं काही महिन्यांपासून बंद होती. पण काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील नाट्यगृहं पुन्हा सुरू झाली असून एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू झाले आहेत. पण गेल्या आठवड्यात चिंचवडला झालेल्या प्रयोगानंतर प्रशांत दामले यांना कोरोनाची काही लक्षणं जाणवत असल्यामुळे त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. त्यामुळे त्यांनी आता या नाटकाचे काही आगामी प्रयोग रद्द केले आहेत.

प्रशांत दामले यांनीच फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. प्रशांत दामले यांनी कोरोनाची टेस्ट केल्यानंतर त्यांना आता सात दिवस आयसोलेशनमध्ये राहाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या व्हिडिओत ते बोलताना दिसत आहेत की, चिंचवडचा प्रयोग झाल्यानंतर मला थोडी कणकण जाणवली. म्हणून मी मुंबईत आल्यावर कोरोनाची टेस्ट केली असता मी काठावर पास झालो आहे. काठावर पास तर मी शाळेपासूनच होत आहे. पण हा काठ तसा डेंजर आहे. त्यामुळे काठावर असलो तरी मला सात दिवस आयसोलेशमध्ये राहाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. मी ठणठणीत असून  माझ्यासोबत माझे सहकलाकार, बॅकस्टेज आर्टिस्टदेखील ठणठणीत आहेत. पण मी आयसोलेशनमध्ये असल्याने उद्याचा बोरीवलीचा आणि परवाचा ठाण्याचा प्रयोग आम्हाला रद्द करावा लागत आहे. मी थोडासा काठावर असून मी काठावरून मागे येतो आणि पुन्हा कामाला सुरुवात करतो. मी काळजी घेतो, तुम्ही देखील तुमची काळजी घ्या...

प्रशांत दामले यांनी व्हिडिओद्वारे अतिशय खेळकर अंदाजात त्यांच्या तब्येतीविषयी त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या सकारात्मक वृत्तीला सगळेच दाद देत आहेत. 

Web Title: prashant damle tested positive for covid 19, eka lagnachi pudhchi goshta shows got cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.