Timepass 3 box Office collection : ‘टाइमपास 3’वर पब्लिक खूश्श, चार दिवसांत कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 12:56 PM2022-08-03T12:56:04+5:302022-08-03T12:56:12+5:30

Timepass 3 box office collection : ‘टाइमपास’ हा सिनेमा तुफान गाजला. यानंतर आलेला ‘टाइमपास 2’ सुद्धा हिट झाला. आता या फ्रेन्चाइजीचा ‘टाइमपास 3’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय.

Prathamesh Parab And Hruta Durgule Starrer Timepass 3 box office collection | Timepass 3 box Office collection : ‘टाइमपास 3’वर पब्लिक खूश्श, चार दिवसांत कमावले इतके कोटी

Timepass 3 box Office collection : ‘टाइमपास 3’वर पब्लिक खूश्श, चार दिवसांत कमावले इतके कोटी

googlenewsNext

Timepass 3 box office collection :   ‘टाइमपास’ हा सिनेमा तुफान गाजला. यानंतर आलेला ‘टाइमपास 2’ सुद्धा हिट झाला. आता या फ्रेन्चाइजीचा ‘टाइमपास 3’ (Timepass 3 ) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. प्रथमेश परब ( Prathamesh Parab) आणि हृता दुर्गुळेच्या (Hruta Durgule) अभिनयाने सजलेल्या या चित्रपटात 4 दिवसात भरभक्कम कमाई केली आहे.
 
प्रथमेशने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. ‘पब्लिकच्या प्रेमासह मराठी ब्लॉकबस्टर टाइमपास 3 ची बॉक्स ऑफिसवर दणक्यात एण्ट्री. 4 दिवसांत कमावले 4. 36 कोटी, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,  बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. चित्रपट प्रदर्शित झाला आणि  पहिल्या दिवशी या चित्रपटाने 80 लाखांचा गल्ला जमवला. त्यानंतर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाने 1 कोटी 10 लाखांचा बिझनेस केला.  रविवारी या चित्रपटाने 1 कोटी 90लाखांची कमाई केली होती. गेल्या चार दिवसात चित्रपटाने 4 कोटी 36 लाख रुपये कमावले आहेत.  
‘टाइमपास 3’ या चित्रपटात हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहेत.

अशी आहे कथा
 दगडूच्या आयुष्यातून प्राजु निघून गेल्यानंतर कॉलेजमध्ये त्याची झालेली एन्ट्री आणि तिथे त्याच्या आयुष्यात एन्ट्री होते ती पालवीची (हृता दुगुर्ळे). पण ही लव्हस्टोरी दगडूच्या आधीच्या लवस्टोरी सारखी अजिबात नाही. सालस आणि अगदी साधी प्राजु होती त्याच्या अगदी उलट आहे ही धडाकेबाज पालवी. पालवीचा फप्फा (पप्पा) म्हणजे एरियातला मोठा डॉन दीनकर पाटील (संजय नार्वेकर). त्यात प्राजुचा बाबा लेले (वैभव मांगले) उर्फ शाकाल आहेच. या सगळ्यांचा नेमका झांगडगुत्ता कसा जुळतो आणि त्यातून दगडू आणि पालवीची ही प्रेम कहानी विविध पैलूंमधून रंगत जात सिनेमा घडत जातो.  

Web Title: Prathamesh Parab And Hruta Durgule Starrer Timepass 3 box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.