Video: बायको म्हणताना खुपच वेगळं वाटतं..; लग्नानंतर क्षितीजाच्या पहिल्या वाढदिवशी प्रथमेशची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:59 PM2024-03-05T12:59:26+5:302024-03-05T13:01:34+5:30
लग्नानंतर बायकोच्या पहिल्या वाढदिवसाचं प्रथमेशकडून खास सेलिब्रेशन
काहीच दिवसांपुर्वी प्रथमेश परबने त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत थाटामाटात लग्न केलं. प्रथमेशच्या लग्नाची खुप चर्चा झाली. प्रथमेशने शेअर केलेल्या व्हिडीओ - फोटोंना त्याच्या फॅन्सने चांगली पसंती दर्शवली. लग्नानंतर प्रथमेशने बायकोचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. प्रथमेशने कुटुंबासोबत हा वाढदिवस साजरा केलाय.
प्रथमेशने क्षितीजाच्या वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत प्रथमेशने क्षितीजासाठी महागडी अंगठी, ब्रेसलेट आणि नेकलेस आणलेला दिसतोय. व्हिडीओखाली प्रथमेशने कॅप्शन लिहीलंय की, "Happy birthday बायको.. बायको म्हणताना खूपच वेगळ वाटतं ...आपल वाटतं.. तुझ असणं , हसणं , रडणं , रुसण ,समजून घेणं , समजावणं , सतत हसत राहणं , लोकांना ही हसवत ठेवणं सगळचं खूप भारी आहे.... thank you सगळ्या गोष्टींसाठी."
प्रथमेश - क्षितीजा या दोघांनी २४ फेब्रुवारीला एकमेकांशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. प्रथमेश - क्षितीजा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. अखेर फेब्रुवारी २०२४ मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी क्षितीजाने घेतलेला उखाणा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता.