"गर्लफ्रेंडला बायको कसं बनवायचं?" प्रशमेश परबला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्याने दिलं हटके उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 15:28 IST2024-05-12T15:27:31+5:302024-05-12T15:28:16+5:30
एका चाहत्याने प्रथमेशला "गर्लफ्रेंडला बायको कसं बनवायचं?" असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला प्रथमेशने दोनच शब्दात पण हटके पद्धतीने उत्तर दिलं.

"गर्लफ्रेंडला बायको कसं बनवायचं?" प्रशमेश परबला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्याने दिलं हटके उत्तर
प्रथमेश परब हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. 'टाइमपास' या चित्रपटामुळे प्रथमेश प्रसिद्धीझोतात आला. यानंतर अनेक सिनेमांमधून प्रथमेशने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या प्रथमेशने कोणताही गॉडफादर नसताना मराठी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. प्रथमेश सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
प्रथमेशचा चाहता वर्गही मोठा आहे. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट तो चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतो. नुकतंच प्रथमेशने इन्स्टाग्रामवर Askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने दिलखुलासपणे उत्तरं दिली. एका चाहत्याने प्रथमेशला "गर्लफ्रेंडला बायको कसं बनवायचं?" असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला प्रथमेशने दोनच शब्दात पण हटके पद्धतीने उत्तर दिलं. "लग्न करून", असं उत्तर प्रथमेशने चाहत्याला दिलं.
दरम्यान, प्रथमेश काही महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकला. क्षितीजा घोसाळकरबरोबर लग्नगाठ बांधत प्रथमेशने नव्या आयुष्याला सुरुवात केली. क्षितीजा आणि प्रथमेश गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.