Prathamesh Parab : दगडूचं लग्न ! मुंडावळ्या बांधून प्रथमेश तयार; कोण आहे ती मुलगी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 10:24 AM2022-12-20T10:24:33+5:302022-12-20T10:28:36+5:30

मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाने वारे वाहताना दिसत आहेत. आपला दगडु म्हणजेच प्रथमेश परबलाही लग्नाची घाई झालेली दिसते.

prathamesh-parab-shared-wedding-news-says-wait-for-an-invitation-till-thursday | Prathamesh Parab : दगडूचं लग्न ! मुंडावळ्या बांधून प्रथमेश तयार; कोण आहे ती मुलगी ?

Prathamesh Parab : दगडूचं लग्न ! मुंडावळ्या बांधून प्रथमेश तयार; कोण आहे ती मुलगी ?

googlenewsNext

मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाने वारे वाहताना दिसत आहेत. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी, अभिनेता आशय कुलकर्णी यांनी यावर्षीच लग्नगाठ बांधली. तर दुसरीकडे आपला दगडु म्हणजेच प्रथमेश परबलाही लग्नाची घाई झालेली दिसते. मुंडावळ्या बांधून हातात हार घेऊन दगडू तयार दिसतोय.

गुरुवारपर्यंत कळ काढा...प्रथमेशची पोस्ट 

प्रथमेशने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आमचं ठरलं आहे लग्नाला यायचं हं, तर पत्रिका गुरुवारी पाठवतोय असं म्हणलं आहे. मुंडावळ्या बांधून हातात हार घेऊन प्रथमेश तयार दिसतोय. पुढील सिनेमासाठीच प्रथमेशची ही प्रमेशनल स्टॅटेजी वाटते. सगळेच विचारतायेत...विचार केला सांगून टाकू...गुरुवार पर्यंत कळ काढा असं कॅप्शन त्याने दिले आहे.

यंदाच्या दिवाळीत प्रथमेशने एका मुलीसोबत फोटो पोस्ट करुन चाहत्यांना सरप्राईजच दिले होते. क्षितिजा घोसाळकरसोबत त्याने दिवाळीला फोटो टाकला होता.चाहत्यांनी तर प्रथमेशला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. प्रथमेशला खऱ्या आयुष्यातली प्राजू भेटली अशा शब्दात प्रथमेशच्या या पोस्टचे स्वागत करण्यात आले.

आता ही लग्नाची पत्रिका खरी की प्रमोशनल स्ट्रॅटेजी हे आता गुरुवारीच कळेल. प्रथमेश नुकताच दृश्यम २ मध्ये दिसला होता. दृश्यम प्रमाणेच त्याच्या सिक्वलमध्येही प्रथमेश भाव खाऊन गेला. आता लवकरच तो एका मराठी सिनेमात दिसणार आहे.

Web Title: prathamesh-parab-shared-wedding-news-says-wait-for-an-invitation-till-thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.