'Reels आणि रंगमंच...', प्रथमेश परबची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:41 AM2024-03-28T11:41:14+5:302024-03-28T11:57:32+5:30

नाटक हे खूप retakes घेऊन शूट केलेल्या Reels पेक्षा जास्त जिवंत वाटतं, असं प्रथमेशनं म्हटलं आहे.

Prathamesh Parab Shares Post About Difference Between Drama And Reels On World Theatre Day 2024 | 'Reels आणि रंगमंच...', प्रथमेश परबची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट पोस्ट चर्चेत

'Reels आणि रंगमंच...', प्रथमेश परबची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट पोस्ट चर्चेत

काही कलाकार रंगभूमीच्या प्रेमात असल्यामुळे त्याच रंगभूमीशी अतूट नातं जुळलेलं असतं. असाच एक अभिनेता म्हणजे प्रथमेश परब.  २७ मार्च हा दिवस दरवर्षी 'जागतिक रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने प्रथमेश परबनेसोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. प्रथमेशनं रंगभूमी आणि सध्याच्या सोशल मीडियावरील रील्स यावर भाष्य केलं आहे.  रील्सवर आलेल्या कमेंट्सपेक्षा शिट्ट्या आणि टाळ्या यांसारखी दुसरी शाबासकीची थाप नाही, असं म्हणत त्यानं रंगभूमीचं महत्त्व समजून सांगितलं. 


'Reels आणि रंगमंच’ असं कॅप्शन देत प्रथमेशनं सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. त्यानं लिहलं, 'आज २७ मार्च २०२४!  जागतिक रंगमंच दिवस… नाटक जगलेल्या आणि नाटकावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलावंताला व त्या कलेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना मन:पूर्वक शुभेच्छा! आमच्या वेळेस ११ वी ला कॉलेजमध्ये प्रवेश घेताना, कलेची आवड असणारा तो किंवा ती, ज्या कॉलेजमध्ये एकांकिका किंवा नाटकाला जास्त महत्त्व मिळेल त्या कॉलेजला प्राधान्य देत असत'.

प्रथमेश पुढे लिहितो, 'काळ बदलला…माध्यमं बदलली…आणि आजकाल एकांकिकेच्या क्रेझची जागा हळुहळू reels ने replace केली आहे. Reel हे माध्यमही चांगलच आहे म्हणा, त्यातही चांगला content सादर करता येतोच, पण तरीही अभिनयाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी रंगमंच जगायला हवा. अनेक महिन्यांची तालीम, पाठांतर, एकांकिका स्पर्धा आणि त्यानंतर One Take मध्ये सादर केलेलं नाटक, खूप retakes घेऊन शूट केलेल्या Reels पेक्षा जास्त जिवंत वाटतं. वेगवेगळ्या Transition आणि स्लो मोशनपेक्षा फिरता रंगमंच अंगावर जास्त काटा आणतो. रील्सवर आलेल्या कमेंट्स वाचून छान वाटतं पण स्टेजवर लाइव्ह परफॉर्म करताना, आपल्यासाठी वाजणाऱ्या शिट्ट्या आणि टाळ्या यांसारखी दुसरी शाबासकीची थाप नाही'.

पुढे तो लिहतो, "अभिनय सादर करायचं कोणतंही माध्यम वाईट नाही. परंतु, अभिनय सादर करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अभिनय ही कला आहे आणि ती सरावानेच आत्मसात करता येते. म्हणूनच बॅकस्टेज, तिसरी घंटा, ब्लॅकआऊट, फंबल, लाइट व रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत या वाक्यातील विलक्षण अनुभव एकदा तरी जगायलाच हवा, तरच रंगमंच जगेल अन् खऱ्या अर्थाने टिकून राहील, असं प्रथमेशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Web Title: Prathamesh Parab Shares Post About Difference Between Drama And Reels On World Theatre Day 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.