Prathamesh Parab : 'बाबा, तुम्ही आयुष्यभर...', 'फादर्स डे' निमित्त प्रथमेश परबची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 02:57 PM2024-06-16T14:57:45+5:302024-06-16T14:58:31+5:30

अभिनेता प्रथमेश परबने वडिलांसाठी खास पोस्ट लिहली आहे.

Prathamesh Parab's emotional post on the occasion of 'Father's Day' | Prathamesh Parab : 'बाबा, तुम्ही आयुष्यभर...', 'फादर्स डे' निमित्त प्रथमेश परबची भावुक पोस्ट

Prathamesh Parab : 'बाबा, तुम्ही आयुष्यभर...', 'फादर्स डे' निमित्त प्रथमेश परबची भावुक पोस्ट

प्रत्येकाच्या आयुष्यात वडील हे सुपरहिरो म्हणून रोल करत असतात. वडील पंखांना बळ देतात, आपली स्वप्ने सत्यात उतरवण्याची ताकद देतात.  आज 16 जून रोजी  जागतिक पितृदिन हा खास दिवस साजरा केला जातो.  'फादर्स डे' निमित्त मराठी सेलिब्रेटी आपल्या वडिलांबरोबर फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्याविषयी भरभरून लिहित आहेत. अभिनेता प्रथमेश परबनेही वडिलांसाठी खास पोस्ट लिहली आहे.

प्रथमेश परबने इन्स्टाग्रामवर वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. ज्यामध्ये त्याचे वडील सायकल चालवताना दिसत आहे. पोस्ट शेअर करताना प्रथमेशने कॅप्शन लिहलं की, "हॅप्पी फादर्स डे पप्पा, गेल्या काही वर्षांत खूप काही बदललं. वेगवेगळे सिनेमे, त्यातील कॅरेक्टर्स, कथा, तुम्हाला माणूस म्हणूनही घडवत असतात. चाळीमधून फ्लॅट सिस्टिममध्ये शिफ्ट झालो, आता स्विफ्टची जागा क्रेटाने घेतली. लाईफस्टाईल अपग्रेड होत असली तरी काही गोष्टींची पाळंमुळं आपल्यात कायम रुजू द्यावी हे मात्र मी माझ्या बाबांकडून शिकतोय'.

पुढे तो म्हणतो, 'गेली 30 ते 35 वर्षे ते सायकल चालवतात. अजूनही ऑफिसला ते सायकलने जातात. काम करत रहावं, माणूस आपोआप fit रहातो असं त्यांचं म्हणणं! बाबा, तुम्ही आयुष्यभर असेच fit आणि आनंदी रहा याच father's Day च्या शुभेच्छा!'.  प्रथमेश परबची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

लेक लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही प्रथमेशचे वडील आज सुद्धा चक्क सायकलवरुन कामाला जातात. वडिलांबद्दल प्रथमेश अनेक मुलाखतींमध्ये भरभरुन बोलताना दिसतो. प्रथमेश मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने क्षितीजा घोसाळकर हिच्यासोबत मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली. प्रथमेश मराठी कलाविश्वात सक्रीय असून त्याने टाइमपास, बीपी, टकाटक, डिलिव्हरी बॉय, डार्लिंग, 35% काठावर पास, बालक-पालक, उर्फी अशा कितीतरी सिनेमात काम केलं आहे.
 

Web Title: Prathamesh Parab's emotional post on the occasion of 'Father's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.