'दिल से अमीर' प्रथमेश परबला लागली ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:14 IST2022-06-29T17:14:02+5:302022-06-29T17:14:42+5:30
Prathamesh Parab: 'हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ असं म्हणत दगडू या भूमिकेतून प्रथमेश सगळ्यांसमोर आला आणि सगळ्यांचा लाडका सुद्धा झाला.

'दिल से अमीर' प्रथमेश परबला लागली ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरी!
'हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ असं म्हणत दगडू या भूमिकेतून प्रथमेश सगळ्यांसमोर आला आणि सगळ्यांचा लाडका सुद्धा झाला. याआधी बालक पालक मधून देखील प्रथमेशने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता, पण टाईमपासचा बिनधास्त, टपोरी आणि प्रेमळ दगडूने त्याला विशेष ओळख मिळवून दिली. त्यानंतर 'दिल से अमीर' असलेल्या दगडूचे अनेक चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत. इतकेच नव्हे तर भुवन बामच्या 'ताजा खबर' या हिंदी वेब सिरीजमध्येही त्याला भूमिका मिळाली.
प्रथमेश परब येत्या काळात 'दृश्यम' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. शिवाय, टाईमपासच्या तिसऱ्या भागात आणि टकाटक चित्रपटाच्याही सीक्वलमधून तो चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे सर्वांनाच माहित आहे. थोडक्यात काय तर प्रथमेश परबला ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरीच लागली आहे. प्रथमेशची अभिनय कारकीर्द अॅक्टींग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोव्हर्स देखील आहेत.
प्रथमेशने प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या टाईमपास ३ संबंधित एक पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. टाईमपास सिनेमाच्या कथेइतकीच जवळची वाटतात ती या सिनेमातील गाणी. अवघ्या महाराष्ट्राला, 'प्रेमाचे वेड' लावणाऱ्या, टाईमपास १ आणि २ च्या गाण्यांइतकीच, धमाकेदार गाणी टाईमपास ३मध्ये देखील आहेत. आई बाबा आणि साई बाबा शप्पथ....जाम भारीssssssssss वाटलं.
असंच प्रेम राहू द्या, कारण #Dagadu_is_Back असे लिहत प्रथमेश परबने आपला आनंद व्यक्त केला आहे.