प्रवीण कुवर यांचे नवे धमाकेदार गाणे 'तू माझी ब्युटीक्वीन'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 07:15 AM2018-11-27T07:15:00+5:302018-11-27T07:15:00+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या स्वरसाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक प्रवीण कुवर आणखी एक नवे- कोरे गाणे घेऊन आपल्या भेटीला येत आहेत.

Praveen Kuwar new song Tu Majhi Beauty quin | प्रवीण कुवर यांचे नवे धमाकेदार गाणे 'तू माझी ब्युटीक्वीन'

प्रवीण कुवर यांचे नवे धमाकेदार गाणे 'तू माझी ब्युटीक्वीन'

googlenewsNext
ठळक मुद्दे'तू माझी ब्युटीक्वीन' हे नॉन फिल्मी गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या स्वरसाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक प्रवीण कुवर आणखी एक नवे- कोरे गाणे घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. सृष्टी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने  'तू माझी ब्युटीक्वीन' या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याच्या ध्वनीमुद्रणाला नुकतीच पुण्यातील व्ही.एस.एच स्टुडिओ येथे उत्साहात सुरुवात झाली.

प्रवीण कुवर यांनी आपल्या सुरेल आवाजाने आपला स्वतःचा असा एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गाण्याला रसिक प्रेक्षक अक्षरशः भरभरून प्रतिसाद देत असतात. एकापेक्षा एक दमदार गाणी गात रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे प्रवीण कुवर यांचे 'तू माझी ब्युटीक्वीन' हे धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला घेऊन येत आहेत.या गाण्यातून अभिनेता किशोर बोरकर झळकणार आहे.

'तू माझी ब्युटीक्वीन' हे नॉन फिल्मी गाणे सर्वांना थिरकायला भाग पाडेल यात जराही शंका नाही. या गाण्यामधून नवीन आणि आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे. हे गाणे म्हणजे रसिकांसाठी सरप्राइज असेल. या गाण्याचे गीतकार राहुल सूर्यवंशी असून विनय देशपांडे यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे. सृष्टी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या गाण्याची निर्मिती केली आहे. तसेच नृत्य दिग्दर्शन दिपक कुमार हे करणार आहेत. ह्या गाण्याचे निर्माता काशिनाथ कुढले असून दिग्दर्शनाची बाजू किरण शशिकांत जाधव हे संभाळणार आहेत. आता हे गाणे प्रेक्षकांना भावेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Praveen Kuwar new song Tu Majhi Beauty quin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.