'देवमाणूस'च्या तालावर नाचले प्रवीण तरडे; खतरनाक डान्स व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 19:05 IST2023-05-04T19:04:33+5:302023-05-04T19:05:14+5:30
Pravin tarde: किरणने मुळशी पॅटर्न सिनेमातं आरारारा...खतरनाक हे गाणं लावलं आणि प्रवीण तरडेंनी त्यावर ठेका धरला.

'देवमाणूस'च्या तालावर नाचले प्रवीण तरडे; खतरनाक डान्स व्हिडीओ व्हायरल
'देवमाणूस', 'लागीरं झालं जी' या मालिकेच्या माध्यमातून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड. देवमाणूस या मालिकेत खलनायिकी भूमिका साकारुन किरण खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला. इतकंच नाही तर आजही अनेक जण त्याला देवमाणूस याच नावाने ओळखतो.विशेष म्हणजे किरण सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.त्याच्या तालावर चक्क अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे नाचले आहेत.
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध आणि तितकच चर्चेत येणारं नाव म्हणजे प्रवीण तरडे. दर्जेदार चित्रपट निर्मितीसाठी ओळखले जाणारे प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न या सिनेमात डान्स करताना दिसून आले होते. त्यानंतर आता त्यांनी किरणच्या तालावर डान्स केला आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अलिकडेच चौक या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला. यावेळी सिनेमातील कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या सोहळ्यात किरण गायकवाड म्युझिक सिस्टीम हँडल करताना दिसला. हा कार्यक्रम सुरु असताना किरणने मुळशी पॅटर्न सिनेमातं आरारारा...खतरनाक हे गाणं लावलं आणि प्रवीण तरडे यांनी अचानकपणे ठेका धरला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहता पाहता व्हायरल झाला. दरम्यान, या व्हिडीओमध्ये किरण गायकवाड, प्रवीण तरडे यांच्यासह अभिनेत्री संस्कृती बालगुडेदेखील दिसून येत आहे.