राधेमधील प्रवीण तरडेंची भूमिका पाहून फॅन्स झाले नाराज, या कारणामुळे केले होते चित्रपटात काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:07 PM2021-05-29T16:07:21+5:302021-05-29T16:11:20+5:30

राधे या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दगडू दादा ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून त्यांचे फॅन्स नाराज झाले आहेत.

Pravin Tarde says his fans were upset after watching Radhe | राधेमधील प्रवीण तरडेंची भूमिका पाहून फॅन्स झाले नाराज, या कारणामुळे केले होते चित्रपटात काम

राधेमधील प्रवीण तरडेंची भूमिका पाहून फॅन्स झाले नाराज, या कारणामुळे केले होते चित्रपटात काम

googlenewsNext
ठळक मुद्देराधे या चित्रपटात काम का केले याबाबत आता प्रवीण यांनीच नुकताच खुलासा केला आहे.

राधे हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला असून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दगडू दादा ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून त्यांचे फॅन्स नाराज झाले आहेत. पण या चित्रपटात काम का केले याबाबत आता प्रवीण यांनीच नुकताच खुलासा केला आहे.

सलमानसोबत चांगले नाते निर्माण करण्यासाठी मी राधे हा चित्रपट स्वीकारला असे प्रवीण यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण यांनी सांगितले की, राधे पाहून माझ्या फॅन्सची निराशा झाली आहे. तू इतकी छोटी भूमिका का साकारली असे त्यांचे म्हणणे आहे. पण मी छोट्या छोट्या भूमिका साकारूनच इथपर्यंत आलो आहे असे मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे. भूमिकेच्या लांबीपेक्षा ती भूमिका कशी आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचे असते. सलमान खानसोबत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठीच मी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. माझ्यासाठी हा अनुभव खूपच चांगला होता. एक व्यक्ती म्हणून मला ते प्रचंड आवडतात. 

करिअरच्या सुरुवातीला प्रवीण तरडे यांनी कुंकू या मालिकेसाठी तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं होते आणि ही मालिका सुपरहिट ठरली. त्यानंतर त्यांनी पिंजरा, तुझे माझं जमेना, अनुपमा, असे हे कन्यादान यांसारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांचं लेखन केले. त्यांनी आज एक अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Web Title: Pravin Tarde says his fans were upset after watching Radhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.