"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 10:10 AM2024-05-11T10:10:52+5:302024-05-11T10:11:59+5:30

मुरलीधर मोहोळ आणि राज ठाकरेंसमोर प्रवीण तरडेंनी केलेलं खणखणीत भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालंय (murlidhar mohol, raj thackeray, pravin tarde)

pravin tarde speech viral at murlidhar mohol bjp pune candidate loksabha election raj thackeray | "मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

काल पुण्यात भाजपाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेला मनसे प्रमुख राज ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि इतर राजकीय नेतेमंडळी उपस्थित होती. सभेत जास्त चर्चा झाली ती लेखक-अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या भाषणाची. 'परिस्थिती जेवढी बिकट हिंदू तेवढाच तिखट', अशी पल्लेदार वाक्य घेत प्रवीण तरडेंनी जोरदार भाषण केलं.

प्रवीण तरडेंनी भाषणात मनसे प्रमुख राज ठाकरेंचं कौतुक केलंय. याशिवाय भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाचीही स्तुती केली. प्रवीण तरडे म्हणाले, "मुरलीधर मोहोळ माझा मित्र आहे. मी आज आमच्या दोस्तीचा पॅटर्न खूप लांबवर पोहोचवायला आलोय. कुणीतरी पुण्याचा रंग बदलायचा प्रयत्न करतंय. उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापजाद्याने पुण्यात रक्त सांडलंय. त्यामुळे पुण्याचा रंग बदलणं सहजासहजी शक्य नाही."

प्रवीण तरडे पुढे म्हणाले, "राज ठाकरे मंचावर उपस्थित आहेत. साहेब आमचा आदर्श आहेत. धर्मवीरमधील राज ठाकरेंचा सीन कट झाला. तेव्हा मनसेचे कार्यकर्ते माझ्यावर नाराज झालं. पण साहेबांना त्याचं कारण माहित होतं. मुरलीधर मोहोळचा मित्र म्हणून एवढंच सांगेन की, भाजपाने पुण्याला पुढील अनेक वर्षांसाठी खंबीर नेतृत्व दिलंय. सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करा. मुळशीतल्या मावळ्यांनी मोदींना दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं आहे. हाच मुळशीचा प्रामाणिकपणा आपल्याला लांबवर पोहोचवायचा आहे." असं खणखणीत भाषण प्रवीण तरडेंनी केलंय.

Web Title: pravin tarde speech viral at murlidhar mohol bjp pune candidate loksabha election raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.