बेन्नी दयाल यांच्या उपस्थितीत रंगला 'कॉलेज डायरी'चा संगीत अनावरण सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 08:00 AM2019-01-09T08:00:00+5:302019-01-09T08:00:00+5:30

'कॉलेज डायरी' चित्रपट १६ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

In the presence of Benny Dayal, Rangla unveiled the music of 'College Diary' | बेन्नी दयाल यांच्या उपस्थितीत रंगला 'कॉलेज डायरी'चा संगीत अनावरण सोहळा

बेन्नी दयाल यांच्या उपस्थितीत रंगला 'कॉलेज डायरी'चा संगीत अनावरण सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्दे'कॉलेज डायरी' १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

तरुणाईच्या हृदयातला हळवा कोपरा म्हणजे 'कॉलेज'... जिद्द, मैत्री, धम्माल-मस्ती यातून आलेला बेदरकारपणा म्हणजे 'कॉलेज'... आयुष्याच्या प्रत्येक वळणाला आव्हान देणे म्हणजे 'कॉलेज' आणि या साऱ्यांची सरमिसळ म्हणजे 'कॉलेज डायरी'. मनाने तरुण असणारा प्रत्येकजण कधी ना कधी आपली 'कॉलेज डायरी' उघडून त्यात रममाण होत असतो. अशीच एक अलीकडची 'कॉलेज डायरी' आपल्याला पुन्हा तरुण करण्यासाठी १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत आणि अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाचे संगीत अनावरण प्रसिद्ध गायक बेन्नी दयाल यांच्या हस्ते करण्यात आले. 


अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेला हा कर्णमधुर सोहळा अधिक खुलून आला तो बेन्नी दयाल यांच्या गाण्यामुळे. 'बत्तमीज दिल', 'बँग बॅंग', 'पप्पू कान्ट डान्स', 'डिस्को डिस्को' यांसारख्या पार्टी सॉंग्सवर साऱ्यांना नाचवणारे बेन्नी दयाल तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. 'कॉलेज डायरी'मध्ये 'कोरंगु पट्टू' या तमीळ गीताला त्यांनी स्वरसाज चढवला असून अश्विन यांचे शब्द आहेत तर या गाण्याला रेवा यांचे संगीत लाभले आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश आणि तामिळ अशा पाच भाषांमध्ये गायलेल्या या गाण्यांच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच एक यशस्वी प्रयोग करण्यात आला असून विशेष म्हणजे या गाण्यांच्या निमित्ताने मराठीत सुप्रसिद्ध गायकांची मैफलच जमली आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. शान, बेन्नी दयाल, शाल्मली खोलगडे, आनंदी जोशी आणि निरंजन पेडगावकर यांनी ही गाणी गायलेली आहेत. 'पलके', राइज अॅण्ड फॉल, 'हे मन माझे', 'लहरे', 'सर्वशक्तिमानम' ही इतर गाणी असून ती गणेश-सुरेश आणि गणेश साबळे लिहिली आहेत तर डॅनिएल स्मिथ-सुहित, निरंजन पेडगावकर आणि रेवा यांनी ती संगीतबद्ध केली आहेत.   
'कॉलेज डायरी'ची कथा अनिकेत जगन्नाथ घाडगे यांनी लिहिली असून संवाद अनिकेत जगन्नाथ घाडगे आणि विशाल सांगले यांचे आहेत. या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव,प्रतीक्षा शिवणकर,
शिवराज चव्हाण,अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे,शुभम राऊत, हेमलता रघू, जनार्दन कदम, आदींच्या भूमिका आपल्याला पाहता येतील. सध्या 'कॉलेज डायरी' मधील गाणी विविध सोशल पोर्ट्लसवर उपलब्ध असून तुम्ही त्यांचाआनंद घेऊ शकता. १६ फेब्रुवारीला 'कॉलेज डायरी' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून त्याआधी चित्रपटामधील विविध भाषांतील ही पाच गाणी प्रेक्षकांची मनं जिंकतील यात काही शंका नाही.

Web Title: In the presence of Benny Dayal, Rangla unveiled the music of 'College Diary'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.