पृथ्वीकने शेअर केला शाहरुख खानसोबता फॅन मोमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 15:14 IST2019-08-07T15:05:13+5:302019-08-07T15:14:13+5:30

अभिनेता शाहरूख खानने आपल्या 9 बॉलिवूड सिनेमांमध्ये राहुलची भूमिका रंगवलीय. डर, जमाना-दिवाना, येस बॉस, दिल तो पागल हैं, कुछ कुछ होता हैं, हर दिल जो प्यार करेगा अशा सिनेमांमध्ये त्याने राहुलची भूमिका साकारली आहे.

Prithvik pratap share his fan moment with shahrukh khan | पृथ्वीकने शेअर केला शाहरुख खानसोबता फॅन मोमेंट

पृथ्वीकने शेअर केला शाहरुख खानसोबता फॅन मोमेंट

अभिनेता शाहरूख खानने आपल्या 9 बॉलिवूड सिनेमांमध्ये राहुलची भूमिका रंगवलीय. डर, जमाना-दिवाना, येस बॉस, दिल तो पागल हैं, कुछ कुछ होता हैं, हर दिल जो प्यार करेगा, कभी खुशी कभी गम, चेन्नई एक्सप्रेस आणि फॅन या सिनेमांमधल्या राहुलला किंगखानचे चाहते विसरूच शकत नाहीत. किंबहुना राहुल ह्या नावाला ग्लॅमर लाभलं ते बॉलिवूडच्या ह्या बादशाहमुळेच.


'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या दुस-या पर्वाचा विजेता अभिनेता पृथ्वीक प्रतापनेही 'जागो मोहन प्यारे' ह्या मालिकेत राहुलची भूमिका रंगवली होती.  ह्या मराठी मालिकेतल्या राहुलला नुकतीच बॉलिवूडचा बादशाह असलेल्या राहुलला भेटायची संधी मिळाली.  पृथ्वीकने ही फॅनमोमेंट कॅमे-यात कॅप्चर केली आहे. आणि  आपला शाहरूख खानसोबतचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. हा फोटो टाकताना पृथ्वीकने लिहिले आहे की, “आज मै जो कुछ भी हु.. बस आप के वजह से हु! लाइफ रिस्क पे लगादी आप से मिलने के लिये. अ ड्रीम कमिंग ट्रू” 

या भेटीविषयी पृथ्वीक म्हणाला, “ शाहरूख खानचा एक डायलॉग आहे, ‘इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशीश की हैं’  .... माझ्याबाबतीत अगदी तेच घडलंय. सिनेसृष्टीत काम करणा-या प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते. की बॉलीवूडच्या ह्या किंगला एकदा तरी भेटावं. ती इच्छा पूर्ण होणं, हे स्वप्नवत होतं.”

ही भेट कशी झाली? येत्या काळात शाहरूखसोबत काही प्रोजेक्ट होणार आहे का? असं विचारल्यावर पृथ्वीक म्हणतो, “शाहरूख खानसोबत काम करायला कुणाला नाही आवडणार. पण ह्याविषयीचा खुलासा मी लवकरच करीन. सध्या ह्याविषयी जास्त बोलणं शक्य नाही.”

Web Title: Prithvik pratap share his fan moment with shahrukh khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.