प्रिया बापटला लंडनमध्ये भेटली 'ही' मराठमोळी अभिनेत्री, शेअर केला फोटो; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 17:09 IST2024-07-10T17:05:07+5:302024-07-10T17:09:23+5:30
परदेश दौऱ्यावर त्यांना एक मराठमोळी अभिनेत्रीही भेटली. त्यांचा एकत्रित फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

प्रिया बापटला लंडनमध्ये भेटली 'ही' मराठमोळी अभिनेत्री, शेअर केला फोटो; म्हणाली...
अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. त्यांच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचे प्रयोग लंडनमध्ये सुरु आहेत. तिथले फोटो, व्हिडिओ दोघंही शेअर करत असतात. लंडनमधली धमाल ते चाहत्यांना दाखवत असतात. दरम्यान या परदेश दौऱ्यावर त्यांना एक मराठमोळी अभिनेत्रीही भेटली. त्यांचा एकत्रित फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोण आहे ती अभिनेत्री?
प्रिया बापटने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती एक सरप्राईज दाखवते. लंडनच्या रस्त्यावर फिरताना प्रियाची भेट अभिनेत्री सोनाली कुलकर्णीशी (Sonalee Kulkarni) होते. दोघीही गळाभेट घेतात. सोनालीने प्रिया आणि उमेशसोबत फोटो शेअर करत गंमतीत लिहिले, '११ वर्षांनी भेटलो'. तर यावर प्रियाने लिहिले, 'पुढच्या वेळी लवकर भेट'. तिघंही मराठमोळे कलाकार सध्या लंडनमध्ये धमाल करत आहेत. नुकतंच प्रिया आणि उमेश लंडन दौरा संपवून मुंबईला परत यायला निघाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच सोनाली कुलकर्णीने मुंबईत 'जर तरची गोष्ट' नाटक पाहिलं होतं. तेव्हाही तिने प्रिया उमेशसोबत फोटो पोस्ट केले होते. तसंच नाटकाचं कौतुकही केलं होतं. सध्या प्रिया उमेशच्या या नाटकाचे प्रयोग जोरदार सुरु आहेत.