प्रिया बापट आणि उमेश कामत झळकणार एकत्र, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:22 PM2019-02-06T16:22:33+5:302019-02-06T16:22:38+5:30

2013 साली 'टाईप प्लिज' सिनेमात उमेश आणि प्रिया ही गोड जोडी एकत्र झळकली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र सिनेमात झळकले नाहीत.

Priya Bapat and Umesh Kamat Working Together, Shared photos on social media | प्रिया बापट आणि उमेश कामत झळकणार एकत्र, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

प्रिया बापट आणि उमेश कामत झळकणार एकत्र, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

googlenewsNext

प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो, व्हिडीओ आणि सिनेमाची माहिती सोशल मीडियावर शेअर करून फॅन्सशी संवाद साधतात. आपल्या खासगी जीवनातील बऱ्याच गोष्टीसुद्धा मनमोकळेपणाने दोघं इथं फॅन्ससह शेअर करतात. अशीच एक खास बाब प्रिया बापटने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर केली आहे. तिने एक ग्रुप फोटो शेअर करत उमेश कामतसह ती लवकरच ऑनस्क्रीन झळकणार असल्याचे संकेत दिले आहेत. सिनेमाची कथा, दोघांची भूमिका याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नसले तरीही उमेश आणि प्रियाच्या या आगामी सिनेमाची रसिकांना नक्कीच उत्सुकता असेल.

प्रियाने उमेशह काम करत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले असले तरी अद्याप या चित्रपटाची कथा व शीर्षक समजू शकलेले नसले तरी 'मुरांबा' सिनेमामुळे प्रकाशझोतात आलेला दिग्दर्शक वरूण नार्वेकर याच्या सिनेमात हे दोघे झळकणार असल्याचे कळतंय. 


2013 साली 'टाईप प्लिज' सिनेमात उमेश आणि प्रिया ही गोड जोडी एकत्र झळकली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र सिनेमात झळकले नाहीत. त्यामुळे हे दोघेही कधी ऑनस्क्रीन पाहायला मिळणार याचीच चाहते आतुरतेने वाट पाहात होते. आणि अखेर चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार असेच प्रियाच्या पोस्टमधून समजतंय. तुर्तास ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच फॅन्सकडून आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सहकाऱ्यांकडून दोघांवर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

Web Title: Priya Bapat and Umesh Kamat Working Together, Shared photos on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.