​प्रिया बापट बनली कवियत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2017 07:16 AM2017-06-22T07:16:14+5:302017-06-22T12:46:14+5:30

आपल्या मराठी इंडस्ट्रीत अनेक अष्टपैलू कलाकार आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध क्षेत्रात ते आपले करियर करत आहेत. अनेकांनी ...

Priya Bapat became poetic poet | ​प्रिया बापट बनली कवियत्री

​प्रिया बापट बनली कवियत्री

googlenewsNext
ल्या मराठी इंडस्ट्रीत अनेक अष्टपैलू कलाकार आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध क्षेत्रात ते आपले करियर करत आहेत. अनेकांनी एक लेखक म्हणून देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचसोबत वेळ काढून ते त्यांच्या पॅशनला, त्यांच्या आवडीला वेळ देत असतात. आदिनाथ कोठारे एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका पार पाडताना दिसत आहे. पण या सगळ्यातून वेळ काढून त्याने नुकताच त्याचा ब्लॉग सुरू केला आहे. त्याने त्याचा हा ब्लॉग फादर्स डे च्या निमित्ताने सुरू केला असून डॅडी हा पहिला लेख त्याने या ब्लॉगवर लिहिला आहे.
आदिनाथनंतर आता आणखी एका कलाकाराने चित्रीकरणाच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून त्याच्या कलेला प्राधान्य दिले आहे. प्रिया बापटने आजवर काकस्पर्श, हॅपी जर्नी यांसारख्या चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिचा वजनदार हा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या तिच्या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तिने मराठी प्रमाणेच लगे रहो मुन्नाभाई, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. ती एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच ती एक चांगली कवियत्री असल्याचे खूपच कमी जणांना माहिती आहे. तिने टूमारो म्हणजेच उद्या ही छानशी कविता तिच्या ब्लॉगवर नुकतीच पोस्ट केली आहे. उद्या या कवितेतून तिने तिच्या भावना खूपच छान प्रकारे व्यक्त केल्या आहेत. त्यासोबत एका टेबलवर असलेल्या मेणबत्तीकडे पाहात असतानाच तिचा फोटोदेखील तिने यासोबत पोस्ट केला आहे. या तिच्या पोस्टला अनेक लाइक मिळत असून अनेकांनी प्रतिक्रियांच्या मार्फत प्रियाचे या कवितेसाठी कौतुक केले आहे.

Also Read : ​प्रिया बापट हिमाचलमध्ये करतेय समर एन्जॉय

Web Title: Priya Bapat became poetic poet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.