प्रिया बापटने काय दिले उमेशला गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 05:44 PM2016-12-13T17:44:20+5:302016-12-13T17:44:20+5:30
वाढदिवस म्हटले की काय गिफ्ट मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली असते. तसेच आपल्या आवडत्या कलाकाराला वाढदिवसादिवशी काय गिफ्ट मिळाले ...
व ढदिवस म्हटले की काय गिफ्ट मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली असते. तसेच आपल्या आवडत्या कलाकाराला वाढदिवसादिवशी काय गिफ्ट मिळाले याची उत्सुकतादेखील चाहत्यांना असतेच. आता हेच पाहा ना, नुकताच अभिनेता उमेश बापटचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर प्रि़या आणि उमेशने आपल्या चाहत्यांसोबत फेसबुक लाइव्ह चाट केले आहे. यावेळी त्यांच्या एका चाहत्याने प्रश्न विचारला की, प्रियाने उमेशला वाढदिवसादिवशी काय गिफ्ट केले आहे. त्यावेळी प्रि़याने वाढिदवसादिवशी सायकल गिफ्ट केल्याचे खुलासा उमेशने केला आहे. उमेश आपल्या फिटनेसविषयी किती जागृत असल्याचे माहितीच आहे. मध्यंतरी त्याने सीक्स पॅक बनविल्याचीदेखील चर्चा रंगली होती. त्यामुळेच प्रियाने त्याला सायकल गिफ्ट केले असणार हे नक्की. यावेळी त्यांच्या या फेसबुक लाइव्ह चाटला प्रचंड प्रतिसाद मिळाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे उमेशचा हा वाढदिवस खूपच छान साजरा झाला असल्याचे पाहायला मिळाले. तसेच प्रि़याने यावेळी अभी ना जाओ छोड कर हे गाणे उमेश डेडिकट केले असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे उमेशनेदेखील टाईमप्लीज या चित्रपटानंतर मी आणि प्रिया लवकरच प्रेक्षकांना एकत्रित पाहायला मिळणार असल्याचेदेखील सांगितले आहे. त्यामुळे प्रि़या आणि उमेशच्या चाहत्यांसाठी हे एक नवीन वर्षाचे सरप्राईज असणार हे मात्र नक्की. या दोघांनी ही नेहमीच मराठी चित्रपटसृष्ट्रीला एक से एक चित्रपट दिले आहे. तर प्रि़याचादेखील नुकताच वजनदार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासाठी प्रि़याने बारा ते तेरा किलो वजन वाढविले होते. त्यामुळे प्रि़याचे या चित्रपटासाठी विशेष कौतुकदेखील करण्यात आले आहे.