प्रिया बापटची बातच न्यारी, मराठमोळ्या लूकमध्ये दिसली साजिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 06:30 IST2020-02-12T06:30:00+5:302020-02-12T06:30:00+5:30
नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे.

प्रिया बापटची बातच न्यारी, मराठमोळ्या लूकमध्ये दिसली साजिरी
'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते.
प्रियाने सोशल मीडियावर तिचा साडीतला फोटो शेअर केला आहे. ज्याची भुरळ तिच्या फॅन्सना पडली आहे. या फोटोला प्रियाने 'पलट' असे कॅप्शन दिले आहे. प्रिया या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. तिच्या फॅन्सना देखील प्रिया बापटचा ट्रेडिशनल लूक आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी आपली पसंती दर्शवली आहे.
हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती. सध्या रसिकांच्या विशेष पंसतीस पडत असलेले 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या माध्यमातून उमेश कामतसोबत प्रियाने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.