पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रियाचे आले सौंदर्य खुलून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 05:06 PM2019-05-15T17:06:28+5:302019-05-15T17:12:35+5:30

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे

Priya bapat looks beautiful in yellow dress | पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रियाचे आले सौंदर्य खुलून

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रियाचे आले सौंदर्य खुलून

googlenewsNext
ठळक मुद्देया फोटोत प्रियाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे प्रियाचा हा अंदाज तिच्या फॅन्सना भावला आहे

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकताच प्रियाने तिचा ट्रेडिंशनल अंदाजातला फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा रंग प्रियाच्या सौंदर्याला चार चाँद लावतोय. प्रियाचा हा अंदाज तिच्या फॅन्सना भावला आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  


गेल्या काहि दिवसांपासून प्रिया तिच्या  सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरिजला घेऊन चर्चेत आहे. नागेश कुकुनूर या वेबसिरीचे दिग्दर्शन केले आहे. या वेबसिरिजमध्ये काही बोल्ड सीन्स प्रियाने दिले आहेत. प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. मराठीमध्ये प्रियाने अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने चारचाँद लावले आहेत.

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे  प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली. 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल माध्यमात देखील आपली छाप उमटवली आहे. 

Web Title: Priya bapat looks beautiful in yellow dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.