प्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 20:01 IST2018-12-13T20:01:16+5:302018-12-13T20:01:21+5:30
प्रियाला फिरायला आणि सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घ्यायला आवडते हेही या फोटोच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे.

प्रिया बापट सुट्टी आणि फिरणं मिस करते, शेअर केला इस्तांबूलमधील Throwback Pic
मराठीसह हिंदी सिनेमा, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. आपल्या अभिनयाने ही तिन्ही माध्यमं प्रियाने गाजवली असून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. मराठीसह हिंदी सिनेमात प्रियाने विविध दर्जेदार आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. लवकरच प्रिया पती उमेश कामतसह रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. प्रिया सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह आहे. खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. आपल्या फॅन्ससह संवाद साधता साधता ती त्यांच्यासह फोटो, आगामी सिनेमाचे अपडेट्सही देत असते.
नुकतंच तिने सोशल मीडियावर थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून प्रियाने इस्तांबूलमधील सुट्ट्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जेव्हा तुम्ही सुट्टी आणि फिरणं मिस करता... असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. पांढऱ्या आणि काळ्या पट्टयांचं टी-शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये प्रियाचा अंदाज तिच्या फॅन्सना चांगला भावतो आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत केलेली मज्जा प्रिया मिस करत असल्याचे या फोटोच्या निमित्ताने समोर आले आहे. प्रियाला फिरायला आणि सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घ्यायला आवडते हेही या फोटोच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे. प्रियाने साकारलेली काकस्पर्श सिनेमातील उमा, वजनदार सिनेमातील पूजा, आम्ही दोघीमधील सावी रसिकांना भावली. याशिवाय विविध मराठी सिनेमातील तिच्या भूमिका गाजल्या आहेत. शिवाय मुन्नाभाई एमबीबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या सिनेमातही ती झळकली आहे.