लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 17:45 IST2024-11-26T17:44:42+5:302024-11-26T17:45:07+5:30
स्टेजवर येत प्रिया बापटचं चाहत्यांना सरप्राईज

लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
प्रिया बापट (Priya Bapat) ही मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्री. मालिका, सिनेमे, वेबसीरिज आणि नाटक अशा सर्वच माध्यमांतून ती प्रेक्षकांसमोर आली. प्रत्येक ठिकाणी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. प्रियाचं सौंदर्य, अभिनय कौशल्य सगळ्यावरच चाहते फिदा आहेत. दरम्यान प्रियाने चाहत्यांना वेगळंच सरप्राईज दिलं. Indian Ocean या म्युझिक बँडच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये चक्क प्रियाही त्यांना जॉईन झाली. हा सगळा अनुभव तिने शेअर केला आहे.
Indian Ocean म्युझिक बँडचे अनेक चाहते आहेत. नुकतीच त्यांची कॉन्सर्ट मुंबईत झाली. लाखो चाहते त्यांना लाईव्ह परफॉर्म करताना बघण्यासाठी आले होते. यावेळी चाहत्यांना सरप्राईज मिळालं ते म्हणजे प्रिया बापटचं. कॉन्सर्टमध्ये एकानंतर एक गाणी सुरु असताना मध्येच प्रिया बापट स्टेजवर आली. त्यांच्या आवाजात आवाज मिसळून तिनेही सुंदर परफॉर्मन्स दिला. याचे व्हिडिओ शेअर करत प्रिया लिहिते, "नेहमी लक्षात राहील अशी जादुई संध्याकाळ. Indian ocean च्या कॉन्सर्टमध्ये मी लाईव्ह परफॉर्म करेन अशी मी कधीच कल्पनाही केली नव्हती. कॉलेजच्या दिवसांपासून मी या बँडची चाहती आहे. त्यांचं संगीत मी जगले आहे. याच बँडने माझं खूप छान स्वागत केलं. त्यांच्याच ग्रीनरुममध्ये जाता आलं, त्यांना बॅकस्टेज भेटता आलं आणि त्यांच्यासोबत संगीतावरचं प्रेम शेअर करता आलं हे सगळं स्वप्नच वाटत होतं."
ती पुढे लिहिते, "त्यांच्यासोबत स्टेजवर उभं राहता आलं हा क्षण मी कधीही विसरणार नाही. चाहत्यांना डान्स करताना, चिअर करताना आणि आमच्यासोबत गाताना पाहणं हे जादुई होतं. असे पालक ज्यांनी ही गाणी ऐकली आहेत ते आता त्यांच्या मुलांनाही ते ऐकवत आहेत. हे सगळं बघताना खूप छान वाटलं. हे स्वप्न मला जगता आलं यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते. ३५ वर्ष त्यांचं म्युझिक अनेकांच्या काळजाला भिडलं. ती रात्र खरोखर लक्षात राहण्यासारखी होती. थँक यू."
प्रिया बापटला अभिनयासोबतच गाण्याचीही आवड आहे. ती अनेकदा गाणं गुणगुणताना दिसते. मात्र पहिल्यांदाच तिला असं स्टेजवर म्युझिक बँडसोबत लाईव्ह परफॉर्म करताना पाहिलं. उमेश कामतने तिचा व्हिडिओ शेअर करत मला तुझा अभिमान वाटतो असं म्हटलं होतं.