प्रिया-उमेशच्या 'जर तर ची गोष्ट'ची शंभरी, अभिनेत्रीच्या स्वरसाजातील गाणं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 02:07 PM2024-04-08T14:07:05+5:302024-04-08T14:07:55+5:30

Jar Tar chi Goshta : 'जर तर ची गोष्ट' नाटक आता ‘शंभरी’ साजरी करतेय. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे.

Priya Bapat-Umesh kamat's marathi play 'Jar Tar Chi Gosht' completes 100 play, song released by the actress | प्रिया-उमेशच्या 'जर तर ची गोष्ट'ची शंभरी, अभिनेत्रीच्या स्वरसाजातील गाणं रिलीज

प्रिया-उमेशच्या 'जर तर ची गोष्ट'ची शंभरी, अभिनेत्रीच्या स्वरसाजातील गाणं रिलीज


अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. ते सर्वांचं लाडके कपल असून त्यांचा फॅन फॉलोव्हिंगही खूप आहे. या दोघांची केमिस्ट्री 'जर तर ची गोष्ट' (Jar Tar Chi Goshta) नाटकातून लोकांना अनुभवायला मिळाली. या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. प्रत्येकवेळी नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला. नाट्यरसिकांच्या या प्रेमामुळेच हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी करतेय. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. प्रिया बापटच्या आवाजातील हे सुंदर गीत नात्यातील गुपित दर्शवणारे असून संगीतप्रेमींना हे गाणे आता कुठेही ऐकता येईल. 

जर तर ची गोष्ट या नाटकाने यशाचे शिखर गाठले आहे. सर्व वयोगटाला आवडेल असे हे कौटुंबिक नाटक असल्याने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकवर्ग या नाटकाला लाभत आहे आणि हीच या नाटकाची जमेची बाजू ठरत आहे. या नाटकाबद्दल प्रिया बापट म्हणते, खरंतर हे सांगताना खरंच खूप आनंद होतोय की, आज आमच्या शंभराव्या प्रयोगचा टप्पा आम्ही गाठला आहे आणि इतर प्रयोगांप्रमाणे हा प्रयोगही हाऊसफुल्ल होता. एकाच वेळी मनात अनेक भावना आहेत. आनंद आहे, भारावले आहे, जबाबदारी आहे. या गोष्टी शब्दांत मांडणे अशक्यच. परंतु एक आवर्जून सांगेन, हा पल्ला गाठणे, रसिकप्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाले. तुमचे प्रेम आमच्यावर असेच राहू दे. या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे ही डबल ट्रीट आहे.

यात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह आशुतोष गोखले, पल्लवी अजय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कथा, दिग्दर्शन, कलाकार हे सगळे उत्तम जुळून आल्यानेच ही सर्वोत्कृष्ट कलाकृती आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांचे लेखन या नाटकाला लाभले आहे. नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत. 
 

Web Title: Priya Bapat-Umesh kamat's marathi play 'Jar Tar Chi Gosht' completes 100 play, song released by the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.