प्रिया बापट या आगामी प्रोजेक्टबद्दल आहे खूप उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 08:00 AM2018-11-28T08:00:00+5:302018-11-28T08:00:00+5:30

अभिनेत्री प्रिया बापट लवकरच एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.

Priya Bapat is very excited about her upcoming project | प्रिया बापट या आगामी प्रोजेक्टबद्दल आहे खूप उत्सुक

प्रिया बापट या आगामी प्रोजेक्टबद्दल आहे खूप उत्सुक

googlenewsNext
ठळक मुद्दे'मायानगरी सिटी ऑफ ड्रीम्स' वेबसीरिजमध्ये झळकणार प्रिया बापट प्रिया बापट पौर्णिमा गायकवाडच्या भूमिकेत

मराठीसह हिंदी सिनेमा,मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. आपल्या अभिनयाने ही तिन्ही माध्यमे प्रियाने गाजवली असून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. मराठीसह हिंदी सिनेमात प्रियाने विविध दर्जेदार आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. प्रिया आता पुन्हा एकदा हटके आणि तितक्याच आव्हात्मक भूमिकेसह वेबसीरिजमधून रसिकांच्या भेटीला येत आहे. 'मायानगरी सिटी ऑफ ड्रीम्स' असे या वेबसीरिजचे नाव आहे. समीर नायर यांच्या अप्लॉज एंटरटेन्मेंटने या सीरिजची निर्मिती केली असून प्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकूनुर दिग्दर्शन करणार आहेत. यात प्रिया पौर्णिमा गायकवाड या महत्त्वाकांक्षी,बाणेदार आणि कणखर अशा मुलीची व्यक्तीरेखा साकारणार आहे. या सीरिजबाबत प्रिया खूप उत्सुक असून तिने सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट केली आहे.


प्रिया बापटने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून लिहिले की, मी 'मायानगरी सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसीरिजबाबत खूप उत्सुक आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


मायानगरी हा एक राजकीय ड्रामा असून सत्तेसाठीची स्पर्धा यात पाहायला मिळेल. सीरिजचे पोस्टर पाहता प्रियाच्या पौर्णिमा गायकवाडबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर तिचा हा अंदाज रसिकांना भावतो आहे. हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.'काकस्पर्श' सिनेमातील उमा, 'वजनदार' सिनेमातील पूजा, 'आम्ही दोघी'मधील सावी रसिकांना भावली.शिवाय 'मुन्नाभाई एमबीबीबीएस','लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमातही ती झळकली.आता पौर्णिमा गायकवाड रसिकांना भावणार का हे लवकरच स्पष्ट होईल.

Web Title: Priya Bapat is very excited about her upcoming project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.