प्रियंका चोप्राच्या मराठी सिनेमाचे 'कोहिनुर' गाणे लाँन्च
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2017 01:19 PM2017-06-19T13:19:06+5:302017-06-21T12:20:53+5:30
दीव येथील नयनरम्य ५०० वर्षांपूर्वीच्या पोर्तुगीज काळी किल्ल्यात ह्या गाण्याचे शूट करण्यात आले आहे.
प रियंका चोप्रा च्या पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित काय रे रास्कला चित्रपटाच पहिलं वहिलं मराठी रोमँटिक गाणं चेहरा तुझा कोहिनूर.. नुकतंच डिजिटल प्लॅटफॉर्म वरून लाँन्च करण्यात आलं आहे. व्हेंटिलेटरची हृदयस्पर्शी गाणी आणि त्यांना मिळालेल्या अमाप यशानंतर त्यातील सध्याची सर्वचर्चित गीतकार जोडी रोहन-रोहन यांनी पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीचा काय रे रास्कला या पर्पल पेबल्स पिक्चर्सच्या दुसऱ्या चित्रपटाला आपल्या म्युजिक ने संगीताचा साज चढवला आहे.नुकतीच पावसा ला सुरवात झालेली असून हवेत सर्वत्र प्रेमाचा गंध पसरलेला दिसून येतो आहे. पावसाळ्याच्या ह्या रोमँटिक सिजन मध्ये लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारा संगीत सम्राट सोनू निगम आपल्यासाठी हे एक नवीन रोमँटिक मराठी गाणं घेऊन येतं आहे. गौरव घाटणेकर आणि भाग्यश्री मोटे या नवीन जोडीची प्रेमकथा चेहरा तुझा कोहिनूर या रोमँटिक गाण्याद्वारे उलगडताना दिसून येते. दीव येथील नयनरम्य ५०० वर्षांपूर्वीच्या पोर्तुगीज काळी किल्ल्यात ह्या गाण्याचे शूट करण्यात आलेले असून जणू काही बघताक्षणी प्रेमात पडू अशा ह्या ठिकाणी भाग्यश्रीला पटविण्यासाठी गौरवला मिळालेली सोनूच्या मधूर आवाजाची साथ अजून किती प्रेम युगुलांना आपलं प्रेम मिळविण्यासाठी मदत करेल हे पाहण्यास खरी मजा येणार आहे.चित्रपटातील गाण्याबद्दल विचारले असता चित्रपटाच्या साहाय्य निर्मात्या कुनिका सदानंद म्हणतात की,आजकाल परदेशात जाऊन गाणं अथवा चित्रपट शूट करणं हा जणू काही एक ट्रेंड बनत चालला आहे. परंतू आपल्या भारताला खूप जुना आणि इंटरेस्टिंग इतिहास लाभला आहे. इथे अशी अनेक ठिकाणे आहेत ज्याबद्दल आपल्याला माहितीचं नसतं. ती शोधून तिथे शूटींग करण्याची मजाच वेगळी असते. म्हणूनच आम्ही 'काय रे रास्कला' सिनेमाचं शूट कुठेही परदेशात न करता येथेच दीव ला केलेले आहे.गिरिधरन स्वामी दिग्दर्शित ‘काय रे रास्कला’ या आगामी चित्रपटाची निर्मिती प्रियंका चोप्रा आणि डॉ मधू चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स द्वारे करण्यात आलेली असून कुनिका सदानंद यांनी या चित्रपटाच्या सहाय्यक निर्मातीची भूमिका बजावली आहे.