चित्रपट निर्मितीची ‘ओढ’ असणारा निर्माता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 06:58 AM2018-01-20T06:58:46+5:302018-01-20T12:28:46+5:30
चित्रपटसृष्टीच्या चंदेरी दुनियेचे आकर्षण प्रत्येकालाच असते. या आकर्षणातूनच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकत स्वत:ला सिद्ध करून दाखवणारी अनेक उदाहरण आपण आजवर ...
च त्रपटसृष्टीच्या चंदेरी दुनियेचे आकर्षण प्रत्येकालाच असते. या आकर्षणातूनच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकत स्वत:ला सिद्ध करून दाखवणारी अनेक उदाहरण आपण आजवर पाहिली आहेत.चित्रपटसृष्टीत कोणताही गॉडफादर नसताना ही शंकर तोवर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर चित्रपटनिर्मितीचे स्वप्न पूर्ण केले.लातूरच्या औसा तालुक्यातील मासुर्डी गावचे भूमिपुत्र असलेल्या शंकर तोवर यांचा प्रवास संघर्षाचा होता.लातूरचा भूकंप झाल्यानंतर पुण्यात स्थलांतरित झालेल्या शंकर यांनी सुरुवातीला एसटीडी बुथवर काही काळ काम केल.त्यांनतर मंडप व्यवसायाचं काम हाती घेत आपला व्यवसाय वाढवला. संघर्षाचा हा प्रवास चालू असताना त्यांनी चित्रपटनिर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. या ध्यासातूनच त्यांच्या ‘ओढ’ हा पहिला व्यावसायिक सिनेमा साकार झाला. ‘ओढ’ चित्रपटाची निर्मिती व सहदिग्दर्शन शंकर तोवर यांनी केले आहे.‘ओढ’ चित्रपटाच्या निर्मिताचा प्रवास सोपा नव्हता, इतरांना येतात तशा अनंत अडचणी त्याला आल्या. पण त्यावर मात करत शंकर यांनी चित्रपट पूर्ण केला.‘ओढ’ या आपल्या पहिल्या व्यावसायिक चित्रपटातून त्यांनी आपला मुलगा अभिनेता गणेश तोवर आणि ‘झांसी की रानी’ फेम उल्का गुप्ता यांना रुपेरी पडद्यावर एकत्र आणण्याची किमया साधली आहे.सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती तसेच एस. आर.तोवर यांची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ चे दिग्दर्शन नागेश दरक व एस. आर. तोवर यांनी केले आहे.लातूरच्या अनेक गुणी कलावंताना या चित्रपटात काम करण्याची संधी शंकर तोवर यांनी दिली आहे. या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरणसुद्धा लातूरच्या विविध भागात झालं आहे.मैत्रीची वेगळी परिभाषा दाखवणारा हा सिनेमा प्रत्येकाला भावेल असा विश्वास शंकर तोवर व्यक्त करतात. भविष्यात चांगल्या चित्रपटांची निर्मितीचा शंकर तोवर यांचा मानस आहे.
Also Read:मैत्रीची कथा सांगणारा ‘ओढ’
काही दिग्दर्शकांनी हिंदीसोबतच प्रादेशिक सिनेसृष्टीतही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक नागेश दरक हे त्यांपैकीच एक. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही लक्षवेधी कामगिरी करत दक्षिणेकडचा मानाचा ‘नंदी’ पुरस्कार पटकविणारे दिग्दर्शक नागेश दरक मैत्रीची कथा सांगणारा ‘ओढ’ हा चित्रपट घेऊन आले आहेत.१९ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Also Read:मैत्रीची कथा सांगणारा ‘ओढ’
काही दिग्दर्शकांनी हिंदीसोबतच प्रादेशिक सिनेसृष्टीतही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक नागेश दरक हे त्यांपैकीच एक. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही लक्षवेधी कामगिरी करत दक्षिणेकडचा मानाचा ‘नंदी’ पुरस्कार पटकविणारे दिग्दर्शक नागेश दरक मैत्रीची कथा सांगणारा ‘ओढ’ हा चित्रपट घेऊन आले आहेत.१९ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.