‘सेन्सॉर’च्या नव्या नियमामुळे ‘बबन’ लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 03:53 AM2017-12-26T03:53:08+5:302017-12-26T09:23:08+5:30

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आपला नवा सिनेमा घेउन येण्यास सज्ज झाले आहेत, ‘बबन’ असे ...

Provenance of 'Baban' due to the new rule of 'sensor' | ‘सेन्सॉर’च्या नव्या नियमामुळे ‘बबन’ लांबणीवर

‘सेन्सॉर’च्या नव्या नियमामुळे ‘बबन’ लांबणीवर

googlenewsNext
ष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आपला नवा सिनेमा घेउन येण्यास सज्ज झाले आहेत, ‘बबन’ असे त्यांच्या नव्या सिनेमाचं नाव आहे.  हा चित्रपट येत्या २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या नवीन नियमावलीचा फटका ‘बबन’ ला बसला आहे. बोर्डाच्या नवीन नियमानुसार सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यासाठी ६८ दिवसांचा कलावधी निश्चित करण्यात आला आहे, परिणामी ‘बबन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली असतानाही ती पुढे ढकलावी लागली आहे.

‘बबन’ मध्ये शेतकरी कुटुंबातील महाविद्यालयीन युवकाची हळुवार फुलणारी प्रेमकथा आपल्याला पहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचे आणखी महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की या सिनेमात ५ गाणी असून प्रत्येक गाणं वेगळ्या धाटणीचे आहे. संगीतकार हर्षीत अभिराज यांनी दोन तर ओकारस्वरूप यांनी तीन गाणी संगीतबद्ध केली आहेत.  यातील ‘साज ह्यो तुझा...’ आणि ‘मोहराच्या दारावर....’ ही दोन गाणी युट्युब वर सुपरहिट ठरली असून दोन्ही गीतांना प्रत्येकी सहा लाखाहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत.

‘‘चित्राक्ष फिल्म्स’ निर्मित ‘बबन’ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव यांच्या प्रमुख भूमिकेसह शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, येशु डब्लु सुरेखा, अभय चव्हाण, सीमा समर्थ, कृतीका तुळसकर मृणाल कुलकर्णी, सुरेखा डब्लू यशु, चंद्रकांत राउत, इन्द्रभान कऱ्हे, प्रांजली कानझारकर, मंगेश तुकाराम, शब्बीर शेख, सुरज कदम, बॉबी आढळे यांच्या भूमिका आहेत. “बबन’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

या फोटो मधे भाऊराव यांचे सोबत जी जोडी आहे त्या दोघांनी ख्वाडा सिनेमा बघुन भाऊराव यांना पुढील सिनेमा साठी शुभेछ्चा बरोबरच शंभर रुपये दिले होते, तेच शंभर रुपये भाऊराव यांनी या सिनेमाचे वेळेस वापरले आणि या दोघांना को-प्रोड्युसर म्हनुन घेतले, त्या दोघांची नावे श्री मनोहर मुंगी आणि जोशीकाका अशी आहेत.

ALSO READ :  सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे बबन या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आले एकत्र

Web Title: Provenance of 'Baban' due to the new rule of 'sensor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.