आचरटपणाचा कळस! मराठी अभिनेता भडकला; म्हणाला, "ह्याला समय कारणीभूत आहे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:47 IST2025-02-12T16:47:06+5:302025-02-12T16:47:37+5:30
अरे ही कॉमेडी नाही हे...

आचरटपणाचा कळस! मराठी अभिनेता भडकला; म्हणाला, "ह्याला समय कारणीभूत आहे..."
कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये आक्षेपार्ह जोक केल्याने प्रसिद्ध यु्ट्युबर रणवीर अलाहाबादिया अडचणीत सापडला. पालकांबाबतीत रणवीरने केलेला प्रश्न खूपच विकृत होता. त्याच्या या जोकमुळे वातावरण चांगलंच तापलं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. शिवाय तो एपिसोडही युट्युबवरुन हटवण्यात आला. समय आणि रणवीरसारख्या या लोकांवर अनेकांन टीका टिप्पणी केली आहे. यावर एका मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रियाही आता व्हायरल होत आहे.
अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) नेहमी अनेक विषयांवर आपलं रोखठोक मत देत असतो. आता रणवीर अहलाबादियाच्या जोकवरही त्याने संताप व्यक्त केला आहे. तो लिहितो, "समय रैनाच्या या शोमध्ये अतिशय अश्लील, अचरटपणा चालतो...तुमची वैचारिक घाण महाराष्ट्रात आणू नका. नुसता फालतुपणा असतो...शिव्या असतात, घाणेरडी भाषा असते. कितीवेळा xx करतोस हेच चालू असतं. अरे ही कॉमेडी नाही...हे अचरटपणाचा कळस आहे. रणवीरने सुद्धा अतिशय चुकीचं विधान केलं. पण ह्याला कारणीभूत समय आहे. माझा जाहीर निषेध.."
समय रैना, रणवीर अलाहबादियासोबतच इतरही कॉमेडियन तिथे हजर होते. त्यांचीही चौकशी होणार आहे. रणवीरने या प्रकरणानंतर व्हिडिओ शेअर करत माफीही मागितली. मात्र आता जनता त्याच्यावर संतापली आहे. रणवीरच्या सोशल मीडियावर फॉलोअर्समध्येही घट होत आहे. एकंदरच हे सोशल मीडियावर त्यांची नाचक्कीच होत आहे.