पहेचान कौन ? फेसपॅक लावलेला अभिनेता कोण ? ओळखण्यासाठी लागली सोशल मीडियावर चढाओढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 11:02 IST2021-04-08T10:52:36+5:302021-04-08T11:02:53+5:30
Style trends keep on changing with change of time, this is too followed by actors & actresses,हिंदी असो किंवा मराठी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे.त्यामुळे योगा करताना दिसतात, चेह-याचीही काळजी घेताना दिसतात.

पहेचान कौन ? फेसपॅक लावलेला अभिनेता कोण ? ओळखण्यासाठी लागली सोशल मीडियावर चढाओढ
अभिनेत्रींप्रमाणे अभिनेतेदेखील स्वतःची खूप काळजी घेताना दिसतात. मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या.मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. हिंदी असो किंवा मराठी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे.त्यामुळे योगा करताना दिसतात, चेह-याचीही काळजी घेताना दिसतात.
सोशल मीडियावर अशाच एका मराठी अभिनेत्याचा फोटो व्हायरल झाला आहे. अभिनेते फक्त फिटनेसवर जास्त मेहनत करताना दिसतात. मात्र आता चेह-याचीही ते अधिक काळजी घेऊ लागले आहेत. त्यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज कमी होऊ नये म्हणून तो स्वतःची अशाप्रकारे काळजी घेत आहेत. त्याचा हा फोटो इतर पुरुषांसाठीही नक्कीच प्रेरणा देणार ठरेल हे मात्र नक्की. दुसरीकडे अभिनेता आहे तरी कोण? असा प्रश्न नेटीझन्सना पडला आहे. काहींना अभिनेत्याला ओळखणे कठीण जात आहे तर काहींनी अचूक ओळखले आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सिद्धार्थ चांदेकर असल्याचे चाहते सांगत आहेत.