RaanBaazaar :...हिचा माज, तसाच राहील; प्राजक्ता माळीच्या नवी पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 06:39 PM2022-05-21T18:39:59+5:302022-05-21T18:42:20+5:30

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात रानबाजारमधील तिच्या भूमिकेतील एक फोटो शेअर केला आहे.

RaanBaazaar: ... Prajakta Mali's new post goes viral | RaanBaazaar :...हिचा माज, तसाच राहील; प्राजक्ता माळीच्या नवी पोस्ट चर्चेत

RaanBaazaar :...हिचा माज, तसाच राहील; प्राजक्ता माळीच्या नवी पोस्ट चर्चेत

googlenewsNext

गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या मराठी सिनेइंडस्ट्रीत 'रानबाजार' (RaanBaazaar) या वेबसीरिजचे तीन एपिसोड रिलीज झालेत. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.  यातील त्यांचा बोल्ड अंदाज खूप चर्चेत आला आहे. यामुळे वेबसीरिजमधील बोल्ड दृश्यांमुळे प्राजक्ता माळीला ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो आहे,

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात रानबाजारमधील तिच्या भूमिकेतील एक फोटो शेअर केला आहे. हिची भाषा आणि हिचा माज,तसाच राहील... काल, उद्या आणि आज !  प्राजक्ता माळी As रत्ना असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. एकच नंबर, मस्त आहे webseries ,हो खुपच मस्त अभिनय केला तु अशा कमेंट्स तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत. . तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली असून ती व्हायरल होत आहे.

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या रानबाजार या वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली आहे.

'त्या' दोघींमुळे राजकारणात आणलेल्या वादळाची रंजक गोष्ट!
 'रानबाजार'... नवी कोरी वेबसीरीज पाहा फक्त प्लॅनेट मराठीवर. अ‍ॅप इन्स्टॉल करा आत्ताच! 
अँड्रॉईड युजर्ससाठी >> https://bit.ly/3wCnSPx 
आयफोन युजर्ससाठी >> https://apple.co/39Z5cBS

Web Title: RaanBaazaar: ... Prajakta Mali's new post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.