'रात भर सोयी नहीं...', प्रार्थना बेहरेचा तो बोल्ड व्हिडीओ पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 04:25 PM2023-07-29T16:25:37+5:302023-07-29T16:26:33+5:30

Prarthana Behere : प्रार्थना बेहरेचा सोशल मीडियावरील व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

'Raat bhar savi nahi...', Prathanna Behre's bold video made fans clean bold | 'रात भर सोयी नहीं...', प्रार्थना बेहरेचा तो बोल्ड व्हिडीओ पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

'रात भर सोयी नहीं...', प्रार्थना बेहरेचा तो बोल्ड व्हिडीओ पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere)ने 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेत शेवटची पाहायला मिळाली होती. या मालिकेत तिने नेहाची भूमिका साकारली होती. या मालिकेतून तिला खूप प्रेम मिळाले. या मालिकेत प्रेक्षकांना तिचा सोज्वळपणा, साधेपणा खूप भावला. आजही प्रेक्षक नेहाला मिस करतात. प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर व्हाइट शर्टमधील फोटोंचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, शनिवारचा मूड…गोरी तेरी आँखें कहें, रात भर सोयी नहीं, चंदा देखे चुपके कहीं, और तारे जानते हैं सभी, के किसने दिल ले लिया, किसको दिल दे दिया, ये दिल का लगाना कोई जानता नहीं. प्रार्थनाच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. तिच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. तिच्या या व्हिडीओवर माझी तुझी रेशीमगाठमधल्या कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. श्रेयस तळपदेने लिहिले की, सोई नहीं..?? आप तो फ्रेश लग रहे हो मॅडम. शीतल क्षिरसागरने लिहिले की, Awwww....

प्रार्थना बेहरे हिने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून करिअरची सुरुवात केली आहे. त्यानंतर तिने मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिस्टर सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. लवकरच छुमंतर चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: 'Raat bhar savi nahi...', Prathanna Behre's bold video made fans clean bold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.