मराठी चित्रपटसृष्टीला रेडिओ सिटीची दाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 10:35 AM2018-01-20T10:35:16+5:302018-01-20T16:05:16+5:30

रेडिओ सिटी या देशातील आघाडीच्या रेडिओ नेटवर्कतर्फे आज रेडिओ सिटी सिने ॲवॉर्ड्स मराठीची घोषणा केली. त्याद्वारे मराठी चित्रपट क्षेत्रातील ...

Radio City's ringtone for Marathi cinema | मराठी चित्रपटसृष्टीला रेडिओ सिटीची दाद

मराठी चित्रपटसृष्टीला रेडिओ सिटीची दाद

googlenewsNext
डिओ सिटी या देशातील आघाडीच्या रेडिओ नेटवर्कतर्फे आज रेडिओ सिटी सिने ॲवॉर्ड्स मराठीची घोषणा केली. त्याद्वारे मराठी चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांना गौरविण्यात येणार आहे.तेलुगु,कन्नड,तमीळ भाषिक दोन कोटी श्रोत्यांच्या प्रतिसादानंतर आता नवा विक्रम करण्यासाठी रेडिओ सिटी सिने ॲवॉर्ड्स मराठी  सज्ज झाले आहे.मराठी चित्रपटसृष्टीतील ताऱ्यांची ही निवड श्रोत्यांच्या मतदानातून केली जाणार आहे.या पुरस्कारांच्या ट्रॉफीचे अनावरण प्रसिद्ध सिनेकलाकारांच्या उपस्थितीत झाले.त्यामध्ये सोनाली कुलकर्णी,संजय जाधव,भूषण प्रधान, महेश काळे, हृषिकेश रानडे, सावनी रवींद्र, जतीन वागळे, पल्लवी सुभाष,भार्गवी चिरमुले आणि सुमेध मुद्गलकर यांचा समावेश होता.

 

प्रसिद्ध पार्श्वगायक निखिल मोडगीच्या गणेश वंदनेने ती संध्याकाळ दिमाखदार झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडिओ सिटी आरजे शोनाली आणि केदारने केले आणि यावेळी आरजे विन्नीचे या क्षेत्रात पदार्पणानिमित्त स्वागत झाले. त्यानंतर गायक हृषिकेश रानडे आणि नृत्य समूहाच्या नृत्याचा कार्यक्रम रंगला.यावेळी दृकश्राव्य माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.यामध्ये दादासाहेब फाळके यांच्यापासून आजपर्यंतचा प्रवास उलगडण्यात आला.टिझर,प्रोमोज आणि सेलिब्रेटींची उपस्थिती याद्वारे या उपक्रमाचे प्रसारण झाले. रेडिओ सिटीच्या डिजीटल व्यासपीठावर सेलिब्रेटी व्हिडीओच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहचणार आहेत.त्यासाठी #CityCineAwardsMarathi हा हॅशटॅग तयार करण्यात आला आहे.या उपक्रमाच्या उद्घोषणेप्रसंगी रेडिओ सिटीचे सीईओ अब्राहम थॉमस म्हणाले, ''आम्हाला तेलुगु, तमीळ  आणि कन्नड श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद आणि या कार्यक्रमाला मोठे यश मिळाले.त्यामुळे आता महाराष्ट्रात मराठी रेडिओ सिटी सिने ॲवॉर्ड्स पाऊल उचण्यास आम्हाला आनंद वाटतो आहे. रेडिओ सिटीचे महाराष्ट्रातील अकरा शहरांमध्ये नेटवर्क असून रेडिओ सिटीने नेहमीच मराठीतील कलाकारांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे.या पुरस्कारांच्या माध्यमातून श्रोत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकाराला मत देण्याची संधी मिळणार आहे.त्यासाठी खूप मोठा प्रतिसाद मिळेल,याचा आम्हाला विश्वास वाटतो.यानंतर आम्ही पंजाबी, गुजराती आणि भोजपुरी श्रोत्यांकडे वळणार आहोत.''

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, ''मराठी चित्रपट सृष्टी ही मराठी प्रेक्षकांशी देशभरात जोडली गेली आहे.रेडिओ सिटी पुरस्कारांच्या माध्यमातून मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान होणार आहे, त्याचबरोबर श्रोत्यांना त्यांचा आवडता कलाकार निवडण्यासाठी एक पारदर्शक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.रेडिओ सिटीने नेहमीच मराठी चित्रपट आणि संगीत याला प्रोत्साहन दिले आहे. श्रोतेही नक्कीच त्यांचे प्रेम आपल्या मताद्वारे व्यक्त करतील असा मला विश्वास वाटतो.'' श्रोत्यांना रेडिओ, एसएमएस, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून आपले मत नोंदविता येईल.नामांकन आणि विजेते निवडण्यासाठी श्रोत्यांना ‘सिटी के कोने-कोने से’द्वारे मत नोंदविता येईल. सेलिब्रेटींचे नामांकन १२ विविध विभागांसाठी केले जाणार आहे.त्यामध्ये बेस्ट फिल्म,बेस्ट डिरेक्टर, बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस, बेस्ट डेब्यू मेल, बेस्ट डेब्यू फिमेल, बेस्ट व्हिलन, बेस्ट ॲक्टर इन कॉमिक रोल, बेस्ट म्युझिक डायरेक्टर, बेस्ट लिरीसिस्ट, बेस्ट सिंगर मेल आणि बेस्ट सिंगर फिमेल यांचा समावेश आहे. विजेत्यांच्या गौरव सोहळ्याचे प्रसारण केले जाईल.

Web Title: Radio City's ringtone for Marathi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.