राहुल देशपांडे का संतापला?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 02:11 PM2016-12-13T14:11:24+5:302016-12-13T14:11:24+5:30

 सामान्य व्यक्ती असो या कलाकार प्रत्येक व्यक्तीला आपल मत मांडण्यासाठी  सोशलमीडिया ही हक्काची जागा असते. मध्यंतरी दिलीप प्रभावळकर यांच्याविषयी ...

Rahul Deshpande's anger? | राहुल देशपांडे का संतापला?

राहुल देशपांडे का संतापला?

googlenewsNext
 
ामान्य व्यक्ती असो या कलाकार प्रत्येक व्यक्तीला आपल मत मांडण्यासाठी  सोशलमीडिया ही हक्काची जागा असते. मध्यंतरी दिलीप प्रभावळकर यांच्याविषयी वाईट बातमी पसरली होती. अशा वेळी अभिनेता सिध्दार्थ चांदेकरने अफवा पसरविणाºया लोकांचे सोशलमीडियावर चांगलाच समाचार घेतला होता. आता, सिध्दार्थ पाठोपाठ  शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यानेदेखील सोशलमीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. मात्र राहूलचा हा राग नेटिझन्सविषयी नसून पोलिसांविषयी असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्याने सोशलमीडियावर एक पोस्ट अपलोड केली आहे. तो आपल्या पोस्टमधून सांगतो,  रात्रीचे ११.१५ वाजले आहेत. जोरजोरात डिस्को म्युझिकचा ठणाणा आवाज येतोय. प्रभात पोलिस चौकीला दोनदा फोन केला, कोणीही उचलला नाही. १०० क्रमांकावर चार वेळा फोन केला, तर बिझी. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम रात्री दहाच्या पुढे गेला की लगेच पोलिस कसे हजर होतात? शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या वेळी पोलिसांना सुप्रीम कोटार्चा निर्णय आठवतो, मग आता कुठे गेला आदेश?आज ईदची मिरवणूक आहे म्हणून उशिरापर्यंत धांगडधिंगा सहन करायचा. गणपतीमध्येही तेच. माझा धर्म कलाकाराचा आहे. सूर हे आमचे दैवत आहे. आमच्या देवाची पूजा करताना मात्र सरकार आम्हाला आडवं येत आहे. हे सगळं चालतं मग आमच्या पूजेच्या आड का येता. कारण आम्ही सॉफ्ट टार्गेट आहोत? असा जळजळीत प्रश्न राहुल देशपांडेंनी सोशलमीडियावर उपस्थित केला आहे. त्याच्या या फेसबुक पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. पोस्टला ९५० हून जास्त लाईक्स, तर ६५ हून जास्त शेअर मिळाले आहेत. तसेच सोशलमीडियावर सुमीत राघवनबरोबरच अनेक कलाकारांनी त्याची ही पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळत आहेत. 

Web Title: Rahul Deshpande's anger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.