राज ठाकरे यांनी केले या मराठी चित्रपटाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 05:20 PM2016-12-13T17:20:00+5:302016-12-13T17:20:00+5:30

राजेश मापुसकर दिग्दर्शित व्हेंटिलेटर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असल्याचे पाहायला मिळाले. बॉलिवूडची तगडी कलाकार या चित्रपटाची निर्मिती करत ...

Raj Thackeray praised this Marathi film | राज ठाकरे यांनी केले या मराठी चित्रपटाचे कौतुक

राज ठाकरे यांनी केले या मराठी चित्रपटाचे कौतुक

googlenewsNext
जेश मापुसकर दिग्दर्शित व्हेंटिलेटर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असल्याचे पाहायला मिळाले. बॉलिवूडची तगडी कलाकार या चित्रपटाची निर्मिती करत असल्यामुळे या चित्रपटाची चर्चा खूप रंगली होती. तसेच या चित्रपटाचे प्रमोशन अधिक मराठी कलाकार करत असल्याचे दिसले होते. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर सोशलमीडियावर बरेच भावुक प्रतिक्रि़या पाहायला मिळाल्या आहेत. तसेच आता, या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतर राज ठाकरे यांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले असल्याचे पाहायला मिळत आहे. बाबा आणि मुलाच्या नात्याला हळूवार स्पर्श करणारा हा चित्रपट राज ठाकरे यांच्यादेखील पसंतीस उतरला आहे. कारण नुकतेच त्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.  हा चित्रपट बघताना, मी एखादी सुंदर कादंबरी वाचत असल्याचं मला वाटत होतं. या चित्रपटाच्या कथेचा प्रवाह वाहता आहे....निखळ आनंददायी, जो आपल्याला बांधून ठेवते. असे  राज ठाकरे यांनी व्हेंटिलेटर पाहिल्यानंतर म्हटले आहे. डॉ. मधू चोप्रा यांनी केले असून निर्मितीबरोबरच प्रियंकाने या चित्रपटात अभिनयही केला आहे. तसेच प्रियंका चोप्राचे माझे बाबा.. हे गाणेदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटातील अभिनेता जितेंद्र जोशीच्या अभिनयाचे कौतुकदेखील होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याशिवाय आशुतोष गोवारीकर बरोबर जितेंद्र जोशी, सुकन्या कुलकर्णी मोने, सुलभा आर्या, उषा नाडकर्णी, स्वाती चिटणीस, विजू खोटे, निलेश दिवेकर या कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. 

 

Web Title: Raj Thackeray praised this Marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.