Raj Thackeray: राज ठाकरे यांच्यावर येणार बायोपिक?, व्हायरल होतायेत शूटिंगचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 11:17 AM2024-08-16T11:17:38+5:302024-08-16T11:18:05+5:30

सध्या सोशल मीडियावर एका सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो पाहून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा बायोपिक येणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Raj Thackeray: Raj Thackeray biopic coming?, shooting photos are going viral | Raj Thackeray: राज ठाकरे यांच्यावर येणार बायोपिक?, व्हायरल होतायेत शूटिंगचे फोटो

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्यावर येणार बायोपिक?, व्हायरल होतायेत शूटिंगचे फोटो

कलाविश्वात आतापर्यंत अनेक कलाकार, खेळाडू, राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारीत सिनेमे बनले आहेत. प्रेक्षकांना अशा दिग्गज व्यक्तीमत्त्वांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहायला आवडतो. त्यात आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा जीवन प्रवास लवकरच आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यांच्या बायोपिकच्या शूटिंगलाही सुरूवात झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या सोशल मीडियावर या शूटिंगचे फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोत अभिनेत्री तेजस्विनी पंडित पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर सध्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल होत आहेत. हा फोटोतील अभिनेत्याचा लूक पाहून नेटकरी राज ठाकरेंवर सिनेमा येणार असल्याचे तर्कवितर्क लावत आहेत. या फोटोत राज ठाकरे यांच्यासारख्या दिसणाऱ्या अभिनेत्यासोबत अभिनेत्री तेजस्विनी पंडित दिसत आहे. ती अभिनेत्याला सूचना करताना दिसत आहे. त्यामुळे तेजस्विनी या चित्रपटाचे दिग्दर्शन किंवा निर्मिती करत असल्याचे बोलले जात आहे. सिनेमाच्या सेटवरील फोटो पाहून राज ठाकरेंचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. 

कोणता अभिनेता साकारणार राज ठाकरेंची भूमिका

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या फोटोत राज ठाकरेंसारखा गेटअपमध्ये असलेला अभिनेता कोण असेल, हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. राज ठाकरेंच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता भूमिका साकारेल, याची जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट नेमका काय असणार, कोण कोण कलाकार पाहायला मिळणार आहेत. तसेच तेजस्विनी अभिनेत्री, दिग्दर्शिका की निर्माती यापैकी कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

Web Title: Raj Thackeray: Raj Thackeray biopic coming?, shooting photos are going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.