‘राजा’ साठी एकत्र आले सुखविंदर-शान-उदित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 09:20 AM2018-05-23T09:20:46+5:302018-05-23T14:50:46+5:30

भारतीय संगीतक्षेत्रातील बड्या-बड्या गायकांना मराठी सिनेगीतांचा मोह आवरता आलेला नाही. याच कारणामुळे ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या जमान्यापासून आजच्या डिजीटल युगापर्यंत हिंदीत ...

'Raja' came together for Sukhwinder-Shan-Udit | ‘राजा’ साठी एकत्र आले सुखविंदर-शान-उदित

‘राजा’ साठी एकत्र आले सुखविंदर-शान-उदित

googlenewsNext
रतीय संगीतक्षेत्रातील बड्या-बड्या गायकांना मराठी सिनेगीतांचा मोह आवरता आलेला नाही. याच कारणामुळे ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या जमान्यापासून आजच्या डिजीटल युगापर्यंत हिंदीत वलौकीक मिळवलेल्या बऱ्याच गायकांनी मराठी सिनेमांसाठी गायन केलं आहे. या यादीत गायक सुखविंदर सिंग, उदित नारायण आणि शान यांचाही समावेश आहे, पण ‘राजा’ या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने हे त्रिकूट मराठीत प्रथमच एकत्र आलं आहे. ‘राजा’ या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन शशिकांत देशपांडे यांनी केलं असून, निर्माते प्रवीण काकड यांनी सत्यसाई मल्टिमिडीया प्रा. लि. या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली आहे. आज राजा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या सिनेमाच्या माध्यमातून एका गायकाच्या संघर्षाचा सुरेल प्रवास दाखवतानाच त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून‘राजा’ची कथा सादर केली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाचा पॅाप सिंगर बनण्याचा हा प्रवास सुमधूर व्हावा यासाठी प्रसंगानुरूप येणाऱ्या गाण्यात गुंफलेल्या शब्दांमधील भावनांना उचित न्याय देऊ शकणाऱ्या गायकांची आवश्यकता असल्याने भारतीय संगीतक्षेत्रातील नामवंत 
गायकांची निवड करण्यात आली आहे. सुखविंदर सिंग, शान आणि उदित नारायण यांनी प्रभावी गायनशैलीच्या बळावर आपला वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. त्यांच्या जादूई आवाजाचा स्पर्श ‘राजा’ मधील गीतांना लाभल्यास कथानक अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांच्या मनावर ठसेल या भावनेतून या तीन दिग्गजांना एकत्र आणले आहे.

सुखविंदर यांनी आपल्या बहारदार आवाजाने आजवर बरीच मराठी गाणी अजरामर केली आहेत. ‘राजा’मध्ये त्यांनी ‘झन्नाटा...’ हे वलय मुळगुंद यांनी लिहिलेलं काहीसं वेगळ्या शैलीतील गाणं गायलं असून, ‘हंडीतला मेवा...’ हे गीत त्यांनी मिलिंद शिंदेंसोबत गायलं आहे. यासोबतच सुखविंदर यांनी ‘दगडाचे मन...’ हे गाणं सायली पडघन आणि उर्मिला धनगर यांच्यासोबत गायलं असून, या दोघींसोबतच मिलिंद इनामदार लिखित ‘याद तुम्हारी आए...’ या गाण्यालाही सूर दिला आहे. उदित नारायण यांनी ९०च्या दशकात गायलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. यासोबतच त्यांच्या आवाजातील मराठी गाण्यांनीही संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यश मिळवलं आहे. मुळगुंद यांनीच लिहिलेलं ‘राजा’ सिनेमातील ‘गावचा राजा...’ हे गीत उदित यांच्या आवाजात ऐकायला
मिळणार आहे. शान यांची गायनशैली खूप भिन्न आहे. याच भिन्न शैलीत त्यांनी ‘राजा’मधील ‘हे मस्तीचे गाणे...’ हे गाणं गायलं आहे. याशिवाय शान यांच्या आवाजात ‘राजा’ मधील ‘आज सुरांना गहिवरले...’ हे गाणंही ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. या हिंदीतील दिग्गज गायकांसोबत रोहित राऊत, सौरभ साळुंखे, उर्मिला धनगर, सायली पडघन, मिलिंद शिंदे यांनी यातील गाणी
गायली आहेत.

सौरदीप कुमार हा नवोदित अभिनेता या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करीत असून त्याच्या जोडीला स्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे या नवोदित अभिनेत्री दिसणार आहेत. याशिवाय शरद पोंक्षे,जयवंत वाडकर,राजेश भोसले,सुरेखा कुडची,विनीत बोंडे,पौरस देशपांडेतसेच अनुपम खेर, सुखविंदर सिंग, जस्लिन मथारु हे पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातील गीतरचना वलय मुळगुंद, मिलिंद इनामदार आणि केदार नायगावकर यांनी लिहिल्या असून, संगीतकार पंकज पडघन यांनी या गीतांना संगीत दिलं आहे. छायांकन दामोदर नायडू यांनी केलं आहे, तर मनोज संकला यांचं संकलन आहे. सत्यवान गावडे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

Web Title: 'Raja' came together for Sukhwinder-Shan-Udit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.