राम रतन फुलपगारे या सिनेमाच्या गाण्याचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2016 07:11 AM2016-09-25T07:11:04+5:302016-09-25T12:41:04+5:30

लव मनी फिल्म्स या निर्मिती संस्थेचा राम रतन फुलपगारे या सिनेमाच्या गाण्याचा मुहूर्त नुकताच अंधेरी स्थित एका स्टुडिओ मध्ये ...

Ram Ratan Phulpagare is the music of this cinema | राम रतन फुलपगारे या सिनेमाच्या गाण्याचा मुहूर्त

राम रतन फुलपगारे या सिनेमाच्या गाण्याचा मुहूर्त

googlenewsNext
मनी फिल्म्स या निर्मिती संस्थेचा राम रतन फुलपगारे या सिनेमाच्या गाण्याचा मुहूर्त नुकताच अंधेरी स्थित एका स्टुडिओ मध्ये पार पडला. वैभव देकाटे यांची निर्मिती असलेला हा पाहिलाच मराठी चित्रपट असून दिग्दर्शक शैलेंद्रसिंग राजपूत यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. राम रतन फुलपगारे या मराठी चित्रपटाचे संगीत संदीपश्री व युवराज मोरे यांनी दिले असून गाणी शैलेन्द्रसिंग राजपूत, मनीषा व दीपक अंगेवार यांनी लिहिली आहे. सदर चित्रपटाचे छाया दिग्दर्शन रामसिंग यादव करणार आहेत. या चित्रपटाचे गाणे मंगेश सावंत यांच्या आवाजात रेकॉर्ड केले गेले. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत विजय पाटकर, प्रिया बेर्डे, डॉ विलास उजवणे, नरेश बिडकर, किशोर महाबोले, दिपज्योति नाईक यांचा समावेश आहे.   

Web Title: Ram Ratan Phulpagare is the music of this cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.