रामदास फुटाणे यांचे पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2016 03:43 PM2016-02-23T15:43:22+5:302016-02-23T08:47:05+5:30

रामदास फुटाणे ‘सरपंच भगीरथ’च्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या भूमिकेत पुनरागमन करत आहेत.

Ramdas Futane's return | रामदास फुटाणे यांचे पुनरागमन

रामदास फुटाणे यांचे पुनरागमन

googlenewsNext
रसिद्ध कवी आणि सिनेदिग्दर्शक रामदास फुटाणे बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ग्रामीण जीवन आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित सिनेमे बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेले रामदास फुटाणे आगामी चित्रपट ‘सरपंच भगीरथ’च्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या भूमिकेत पुनरागमन करत आहेत.

उपेंद्र लिमये प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटात ग्रामीण भागात कशा प्रकारे जातीचे राजकारण खेळले जाते याची कथा मांडलेली आहे. गावाचे सरपंचपद राखीव असल्यामुळे एका नेत्याचे मदतीने भगीरथ हा ओबीसी तरुण सरपंच होतो.

पदभार स्वीकारल्यावर त्याला कशा प्रकारे परिस्थिती, राजकीय दबाव, जातीय राजकारणाला सामोरे जावे लागते, त्यातून तो कशा प्रकारे मार्ग काढतो अशी साधरणत: कथा आहे.

bhagirath

पुरस्कार विजेती फिल्म ‘सामना’, ‘सर्वसाक्षी’ अशा अभिजात चित्रपटांचे रामदास फुटाणे यांनी दिग्दर्शन केलेले आहे. चित्रपटात वीणा जामकर भगीरथाच्या पत्नीची भूमिका साकारत आहेत. शाहिर संभाजी भगत संगीतकार म्हणून पदार्पण करीत आहेत. चार मार्च रोजी प्रदर्शित होणाºया या चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला आहे.




Photo Credits : Marathi Movie World

Web Title: Ramdas Futane's return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.