Ramesh Deo : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव अनंतात विलीन, बाबांना निरोप देताना अजिंक्य देव यांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:41 IST2022-02-03T15:36:30+5:302022-02-03T15:41:00+5:30
Ramesh Deo funeral : अभिनेता अजिंक्य देव यांनी बांबाना भरल्या डोळ्यांनी निरोप दिला. बाबांच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला.

Ramesh Deo : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव अनंतात विलीन, बाबांना निरोप देताना अजिंक्य देव यांना अश्रू अनावर
Ramesh Deo funeral : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचं काल बुधवारी निधन झालं. आज दुपारी त्यांच्यावर विलेपार्ले पूर्व परिसरातील पारसी वाडा येथे अंत्यसंस्कार पार पडले. बाबाला निरोप देताना अंजिक्य देव (Ajinkya Deo) यांना अश्रू अनावर झालेत.
अभिनेता अजिंक्य देव यांनी बांबाना भरल्या डोळ्यांनी निरोप दिला. बाबांच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. ‘देव कुटुंबासाठी सर्वात दु:खाचा दिवस आहे. आमचे बाबा आम्हाला कायमचे सोडून गेलेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना प्रचंड खोकला आणि कफही झाला होता. बुधवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केलं होतं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. अभिनय आणि माझ्याशी बाबांनी बराच वेळ गप्पा मरल्या. डॉक्टर आज त्यांना आयसीयूमधून स्पेशल रूममध्ये हलवणार होतं. त्यांना बरं वाटतंय म्हटल्यावर थोड्या वेळासाठी मी ऑफिसला गेलो आणि तेव्हाच मला ते गेल्याची बातमी मिळाली.
काल रात्री 9 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. असं काही होईल, याची आम्हाला जराही कल्पना नव्हती. कारण, ते प्रचंड सकारात्मक होते. या स्वभावामुळे याआधी अनेकदा ते मृत्यूच्या दाढेून परत आले होते. या आजारातूनही ते बरे होतील, हा विश्वास म्हणूनच आम्हा सगळ्यांना होता. पण आमचे बाबा आम्हाला कायमचे सोडून गेलेत,’ असं अजिंक्य म्हणाले.
अजिंक्य तू मला हॉस्पिटलला घेऊन आलास. खूप आनंद झाला. कारण आता मी जाणार आहे, असं बाबा म्हणाले होते. कदाचित त्यांना मृत्यू दिसत होता, हे सांगताना अजिंक्य यांना अश्रू रोखता आले नाहीत.