रांजण चित्रपटातील लख लख... गाणं ही हिट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2017 06:52 AM2017-02-07T06:52:21+5:302017-02-07T12:22:21+5:30
रांजण चित्रपटातील लागीर झालं हं या गाण्यापाठोपाठ आता लख लख गाणंदेखील हिट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लख लख ...
ांजण चित्रपटातील लागीर झालं हं या गाण्यापाठोपाठ आता लख लख गाणंदेखील हिट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लख लख हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला मोठया प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. या गाण्याला नंदेश उमप यांनी स्वरसाज चढविला आहे. अशा पध्दतीने या चित्रपटातील दोन्ही गाणे धमाकेदारपण प्रेक्षकांचे मनं जिंकताना दिसत आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या टीम ने एक वेगळा प्रयोगदेखील केला आहे. चित्रपटात शिवाजी महाराजांचं जे ग्राफिक्स बनवले आहेत ज्या प्रकारे?निमेशन झालं आहे ते खरंच सुरेख आहे. महाराजांच्या गाण्यामुळे हा चित्रपट एक वेगळ्या उंचीवर गेला आहे.त्यामुळे या चित्रपटातील गाणी आणि वेगळा प्रयोगामुळे चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.तर या चित्रपटातील लागीर झालं रं हे गाणे वैभव जोशी यांनी गीतलेखन केले आहे. नरेंद्र भिडे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातील गाणी अजय गोगावले, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे व दीपाली जोग यांनीदेखील गायली आहेत. गाण्यांबरोबरच 'रांजण'मध्ये एक शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमाची कथा आहे. मात्र, ही कथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडते, मुलभूत गोष्टींवर भाष्य करते. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही त्यातून व्यक्त होतो. या चित्रपटात यश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. पुष्कर लोणारकर, अनिल नगरकर, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी हे कलाकारदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. येत्या १७ फेब्रुवारी २०१७ ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी ह्यरांजणह्ण या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.