मराठमोळा रॅपर अडकला लग्नबेडीत, राजेशाही थाटामाटात पार पडला विवाह, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 13:11 IST2019-03-04T13:10:14+5:302019-03-04T13:11:24+5:30
आम्ही पुणेरी म्हणत आपल्या रॅप साँगवर सर्वांना थिरकायला लावणारा मराठमोळा रॅपर सिंगर किंग जेडी उर्फ श्रेयस जाधव नुकताच लग्नबेडीत अडकला आहे

मराठमोळा रॅपर अडकला लग्नबेडीत, राजेशाही थाटामाटात पार पडला विवाह, See Photos
आम्ही पुणेरी म्हणत आपल्या रॅप साँगवर सर्वांना थिरकायला लावणारा मराठमोळा रॅपर सिंगर किंग जेडी उर्फ श्रेयस जाधव नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. ही माहिती खुद्द त्याने सोशल मीडियावर दिली आहे. त्याने त्याच्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत नवीन सुरूवात असे लिहिले आहे.
श्रेयस जाधव नुकताच भाग्यश्री सोमवंशीसोबत लग्नबेडीत अडकला आहे.मुंबईत पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक नामचीन मंडळींनी हजेरी लावून वधूवरास आशीर्वाद दिले.
श्रेयसने सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करीत लग्नाची बातमी सांगितली आहे.
इतकेच नाही तर त्याने त्या दोघांचे एकत्रित नाव श्रेयाश्री असे ठेवले आहे. त्यांचे हे फोटो पाहून राजेशाही थाटामाटात विवाह पार पडल्याचे वाटते. सध्या सोशल मीडियावर त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
श्रेयस जाधव रॅपर म्हणून सगळीकडे प्रचलित आहे. मात्र नुकताच तो स्वप्नील जोशी अभिनीत मी पण सचिन चित्रपटातून लेखक व दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेतून रसिकांसमोर आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.