रवी जाधव यांनी का केले नागराज मंजुळे यांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 03:24 PM2016-12-13T15:24:28+5:302016-12-13T15:24:28+5:30

बॉलिवुड असो या मराठी इंडस्ट्री येथे कलाकारांनी एकमेकांवर टीका करणे, त्यांची भांडणे याची चर्चा मोठया प्रमाणात ऐकण्यास मिळत असते. ...

Ravi Jadhav appreciated Nagraj Manjule's condolences | रवी जाधव यांनी का केले नागराज मंजुळे यांचे कौतुक

रवी जाधव यांनी का केले नागराज मंजुळे यांचे कौतुक

googlenewsNext
लिवुड असो या मराठी इंडस्ट्री येथे कलाकारांनी एकमेकांवर टीका करणे, त्यांची भांडणे याची चर्चा मोठया प्रमाणात ऐकण्यास मिळत असते. पण या चंदेरी दुनियेत कलाकारांनी एकमेकांचे कौतुक करणे सहसा पाहायला मिळत नाही. मात्र या गोष्टीला अपवाद ठरले ते मराठी इंडस्ट्रीचे दोन तगडे दिग्दर्शक. एक रवी जाधव आणि दुसरा म्हणजे नागराज मंजुळे. विशेष म्हणजे रवी जाधव यांनी नागराज मंजुळे यांचे मनभरून कौतुक केले असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. त्यांचे हे कौतुक त्यांनी चित्रपटासाठी केले नाही, तर नागराज यांनी अप्रतिम जेवण बनविले असल्याने त्यांना ही शाबासकी देत असल्याचे रवी जाधव यांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितले आहे. ते सांगतात, नागराज हा सर्वोकृष्ट फिल्ममेकर तर आहेच, त्याचबरोबर तो उत्तम स्वयंपाकदेखील करत असतो. तसेच त्यांनी सोशलमीडियावर एक फोटो ही अपलोड केला आहे. त्यांच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच झक्कास जोडी, सुपर दिग्दर्शक अशा कमेंन्टसदेखील त्यांच्या फोटोला मिळाल्या आहेत. नागराज मंजुळे यांनी आपल्या सैराट या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यत संपूर्ण वातावरणच सैराटमय करून ठेवले होते. त्यांना या चित्रपटासाठी अनेक पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांच्या या चित्रपटाचे यश म्हणजे या मराठी चित्रपटाचा रिमेक बॉलीवूडमध्ये येणार आहे. तर दिग्दर्शक रवी जाधव यांनीदेखील नटरंग, बालक पालक असे अनेक सुपरहीट मराठी चित्रपट दिले आहेत. तसेच त्यांनी बँन्जो या चित्रपटाने बॉलीवूडमध्येदेखील पदापर्ण केले आहे. 


 

Web Title: Ravi Jadhav appreciated Nagraj Manjule's condolences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.