रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 08:00 AM2019-04-04T08:00:00+5:302019-04-04T08:00:00+5:30

रवी जाधव सोशल मीडियावर सक्रीय असून त्या माध्यमातून आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असतो. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

Ravi Jadhav discusses the photo shared on social media | रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची होतेय चर्चा

रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची होतेय चर्चा

googlenewsNext


मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक रवी जाधव नेहमीच वेगळ्या विषयावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असतो. त्यामुळे त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता असते. त्यात रवी जाधव सोशल मीडियावर सक्रीय असून त्या माध्यमातून आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असतो. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. 

रवी जाधवने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बदाम तिर्रीचा फोटो शेअर केला आहे आणि कोणी ओळखू शकेल का? असे कॅप्शन दिले आहे. त्यानंतर या फोटो पाहून तर्कवितर्क लावले जात आहे.

टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार त्यांनी रवी जाधवला संपर्क केला आणि त्याबाबत रवी जाधवला विचारले असता त्याने सध्या तरी यावर काही बोलता येणार नाही, कारण सगळ्याची अगदी सुरुवात आहे, मला यावर बोलण्यासाठी थोडा वेळ द्या, असे सांगितले व पुढे म्हणाला की, जसं मी म्हणालो की आता काही सांगता येणार नाही, जरा थांबा, पण हो हे एका नवीन प्रोजक्ट संबंधी आहे, एका नवीन सिनेमाविषयी आहे, लवकरच अधिक माहिती देणार आहे. 
याचा अर्थ रवी जाधव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवा चित्रपट घेऊन लवकरच येणार आहे. या चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


रवी जाधवचा रंपाट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बालक पालक' चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर पुन्हा एकदा रवी जाधव लहान मुलांचे भावविश्व रंपाट चित्रपटातून मांडणार आहे. मुलांचा त्यांच्या स्वप्नांशी होत असलेला पाठलाग दाखवण्यात आला आहे. 

येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Ravi Jadhav discusses the photo shared on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.