रवी जाधव जुन्या आठवणीत दंग, ‘नटरंग’ची आठवण केली शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 08:00 AM2018-12-04T08:00:00+5:302018-12-04T08:00:00+5:30
'नटरंग' हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातूनच रवी जाधवने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दिग्दर्शक रवी जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव. रवी जाधव यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या मराठी सिनेमांचा जोरदार डंका वाजला आहे. हे सिनेमा रसिकांसह समीक्षकांच्या पसंतीस पात्र ठरले. रवी जाधव सोशल मीडियावरही बरेच सक्रीय असतो. आपले सिनेमा आणि विविध गोष्टींबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मत मांडतो. नुकतंच त्याने सोशल मीडियावर टाकलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोच्या माध्यमातून त्याने ‘नटरंग’ सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नटरंग सिनेमाच्या मुहूर्ताचा फोटो रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत रवी जाधव हे नटरंग सिनेमाच्या मुहूर्ताला चित्रीकरणाचा नारळ वाढवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी नटरंग सिनेमाची स्टारकास्ट आणि रवी जाधवसह पत्नीही उपस्थित आहे. “पहिल्या चित्रपटाचा पहिला दिवस… नटरंगच्या चित्रीकरणाचा नारळ वाढवताना…” अशी पोस्टही त्याने या फोटोसह शेअर केली आहे. अॅडमॅनपासून दिग्दर्शक-लेखक ते अभिनेता असा प्रवास रवी जाधवने केला आहे.
'नटरंग' हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातूनच रवी जाधवने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'नटरंग' हा सिनेमा रसिकांसह समीक्षकांनाही भावला. त्यामुळंच की काय या सिनेमाला २०१० साली राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. तसंच विविध अन्य पुरस्कार सोहळ्यातही नटरंगने बाजी मारली. रवी जाधव नटरंग, बालाक पालक, टाईमपास , टाईमपास 2, न्युड आणि हिंदी बँजो असे हटके सिनेमा दिग्दर्शित करत सिनेसृष्टी आणि रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.