रझा मुराद दिसणार 'या' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 05:11 PM2019-07-03T17:11:38+5:302019-07-03T17:17:30+5:30

मुंबईला ‘स्वप्ननगरी’ म्हटलं जातं. डोळ्यात असंख्य स्वप्नं घेऊन दररोज अनेकजण या शहरात येत असतात.  इथल्या चित्रपटसृष्टीचं, ग्लॅमरच आकर्षण अनेकांना असतं.

Raza Murad will appear in marathi film | रझा मुराद दिसणार 'या' सिनेमात

रझा मुराद दिसणार 'या' सिनेमात

googlenewsNext

मुंबईला ‘स्वप्ननगरी’ म्हटलं जातं. डोळ्यात असंख्य स्वप्नं घेऊन दररोज अनेकजण या शहरात येत असतात.  इथल्या चित्रपटसृष्टीचं, ग्लॅमरच आकर्षण अनेकांना असतं. चित्रपटसृष्टीत नाव कमवायला, नशीब आजमावयला आलेल्यांसाठी तर ही ‘मायानगरी’च असते. प्रत्येक क्षेत्राच्या चांगल्या व वाईट बाजू असतात. चित्रपटसृष्टीही त्याला अपवाद नाही. ग्लॅमरविश्वातील प्रसिद्धी अनेकांना खुणावते पण, या झगमगत्या ग्लॅमरच्या पाठचा चेहरा त्यांना दिसत नाही. त्यातूनच आर्थिक फसवणूक, कास्टिंग काऊच यासारखे गैरप्रकार घडत असतात. चित्रपटसृष्टीच्या याच काळ्या बाजूवर प्रकाशझोत टाकणारा ‘मायानगरी एक सत्य’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्री सद्गुरू प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन गजानन बाकले यांचे तर निर्माते कैलास पाटील उंडे आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच भरत दिघे साहेब(फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर अचिव्ह ग्रुप ऑफ कंपनी) यांच्या हस्ते संपन्न झाला.

ग्लॅमरच्या मोहापायी चूक किंवा बरोबर याचा सारासार विचार न करता अनेकजण चुकीच्या गोष्टींना बळी पडतात. अशा नवोदितांसाठी ‘मायानगरी एक सत्य’ हा चित्रपट डोळ्यात अंजन घालणारा असल्याचे मत निर्माते कैलास पाटील उंडे व दिग्दर्शक गजानन बाकले यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, हर्षदा गुप्ते, रेखा निर्मल, पुरूषोत्तम उपाध्याय, प्रदीप पाटील, तुषार किरण, ज्ञानदेव शिंदे, गजानन बाकले, कैलास पाटील उंडे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. सहनिर्माते बाबसाहेब पारखे तर सहदिग्दर्शक तुषार नन्नवरे आहेत लेखन, पटकथा, संवाद कैलास उंडे यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे छायांकन व्ही.डी नाईक करणार आहेत. कॅमेरा सेटअप व कॉश्च्युमची जबाबदारी आयुष स्टुडिओ सांभाळणार आहे. रंगभूषा प्रदीप दादा तर वेशभूषा मुन्नादादा यांची आहे. प्रकाशयोजना किशोरभाई सांभाळत आहेत.

Web Title: Raza Murad will appear in marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.