रिअल हिरोंची रुपेरी पडद्यावर एन्ट्री; नागराज मंजुळेंच्या सिनेमात झळकणार खरेखुरे पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 04:03 PM2023-03-21T16:03:52+5:302023-03-21T16:04:44+5:30

Ghar banduk biryani: या चित्रपटात नागराज मंजुळे यांचे जे सहकारी पोलीस अधिकारी आहेत, त्यातील काही पोलीस हे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही पोलीसच आहेत.

Real Heroes Entry in cinema Nagraj Manjule's film will feature real police | रिअल हिरोंची रुपेरी पडद्यावर एन्ट्री; नागराज मंजुळेंच्या सिनेमात झळकणार खरेखुरे पोलीस

रिअल हिरोंची रुपेरी पडद्यावर एन्ट्री; नागराज मंजुळेंच्या सिनेमात झळकणार खरेखुरे पोलीस

googlenewsNext

सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'घर बंदूक बिरयानी' (ghar banduk biryani). आतापर्यंत या चित्रपटातील गाणी, टीझर पाहात हा सिनेमा नेमका कशावर आहे याची कल्पना प्रेक्षकांना आलीच असेल. नागराज मंजुळे (nagraj manjule) कायमच चौकटी बाहेर असलेले विषय हाताळण्याचा प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे प्रत्येक सिनेमातून ते नव्या चेहऱ्यांना संधी देतात. यावेळीदेखील घर बंदूक बिरयानी या त्यांच्या सिनेमात त्यांनी चक्क पोलिसांना संधी दिली आहे.

घर बंदूक बिरयानी हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच नागराज मंजुळे अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. या सिनेमात ते एका तडफदार, प्रामाणिक पोलीस अधिकाराच्या भूमिकेत झळकत आहेत. या चित्रपटात नागराज मंजुळे यांचे जे सहकारी पोलीस अधिकारी आहेत, त्यातील काही पोलीस हे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही पोलीसच आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून रिअल पोलीस रिलमध्ये दिसणार आहेत. 

नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात प्रेमकथा असली तरी ते चित्रपट एका विशिष्ट विषयावर भाष्य करणारे, वेगळ्या धाटणीचे असतात. यात नवोदितांना संधी देणे, अभिनयात गावकऱ्यांना प्राधान्य देणे ही नागराज मंजुळे यांची खासियतच आहे. त्या विषयाला वास्तविकतेचा स्पर्श व्हावा, तो विषय प्रेक्षकांना आपल्या जवळचा वाटावा, यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' ही त्याला अपवाद नाही. या चित्रपटात पोलीस आणि डाकूंची चकमक दिसत आहे. हे डाकू हुबेहूब दिसावेत, यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील कलाकार ज्याप्रमाणे त्यांनी वेचले. त्याप्रमाणेच पोलीसही खरे वाटावेत, म्हणून त्यांनी काही रिअल पोलिसांनाच अभिनयाची संधी दिली. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
 

दरम्यान, झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 

Web Title: Real Heroes Entry in cinema Nagraj Manjule's film will feature real police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.